संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल प्रश्नमंजुषा - क्षितिजाच्या पलीकडे समुद्र प्रवास
Posted On:
13 NOV 2023 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023
भारतीय नौदल आणि एन डब्ल्यू डब्ल्यू ए (नेव्ही वेलनेस अँड वेलफेअर असोसिएशन) गेल्या अनेक वर्षांपासून नौदल सप्ताहत उपक्रमांचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करत आहेत. “भारतीय नौदल प्रश्नमंजुषा – THINQ” 2023 च्या आवृत्तीने भारताच्या प्रतिष्ठित जी 20 च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जी 20 सचिवालयाकडून मिळालेल्या भागीदारी आणि समर्थनाच्या आधारावर जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवली आहे. म्हणूनच अगदी समर्पकरित्या या कार्यक्रमाला G20 THINQ देखील म्हटले जात आहे.
हा कार्यक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन स्तरांवर आणि मुंबई आणि नवी दिल्ली येथे दोन ठिकाणी आयोजित केला जात आहे.
G20 THINQ च्या राष्ट्रीय फेरीत विक्रमी, 11,741 शाळांनी नोंदणी केली. पहिली बाद फेरी (ER1) 14 सप्टेंबर 23 रोजी पूर्ण झाली आणि 3902 शाळा पुढील स्तर, ER2 साठी पात्र ठरल्या. ER2 चे आयोजन 03 ऑक्टोबर 23 रोजी करण्यात आले होते आणि 10 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित केलेल्या उपांत्यपूर्व फेरीसाठी एकूण 1674 शाळा पात्र ठरल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या शाळांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. यातून प्रत्येक विभागातील पहिल्या 10 संघांना स्थान निवडले गेले. हे सर्व संघ 18 ऑक्टोबर 23 रोजी टायब्रेकर फेरीत विभाग स्तरावर एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी भिडले होते. या फेरीने खालील 16 शाळांच्या निवडीला अंतिम रूप दिले. या शाळा उपांत्य फेरीत एकमेकांशी सामना करतील:
- भवन्स विद्या मंदिर, गिरीनगर
- डीएव्ही पब्लिक स्कूल, गुडगाव
- दिल्ली पब्लिक स्कूल, भोपाळ
- दिल्ली पब्लिक स्कूल, पाटणा
- दिवाण पब्लिक स्कूल, मेरठ
- डॉ. के.बी. हेडगेवार विद्यामंदिर, कारापूर
- जीडी गोएंका पब्लिक स्कूल, सिलीगुडी
- जीएमएचएसएस कालिकत विद्यापीठ परिसर, कालिकत
- कल्याण कृष्णा पब्लिक स्कूल, रायपूर
- नरेंद्र कॉन्व्हेंट स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, रायपूर
- नेव्ही चिल्ड्रन स्कूल, मुंबई
- सैनिक स्कूल, सातारा
- संजय घोडावत इंटरनॅशनल, कोल्हापूर
- एसएनएमएचएसएस, पुरक्कड.
- सेंट अँथनी सीनियर सेकंडरी स्कूल, उदयपूर.
- स्वामी संत दास पब्लिक स्कूल, जालंधर.
हे 16 संघ 17 आणि 18 नोव्हेंबर 23 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय उपांत्य फेरीसाठी आणि अंतिम फेरीसाठी मुंबईत अनुक्रमे एनसीपीए आणि गेटवे ऑफ इंडिया येथे एकत्र येतील. सहभागी विद्यार्थ्यांना नौदल कर्मचार्यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथील युद्धनौका, पाणबुड्या आणि नौदल विमानावरील नौदल ऑपरेशन्सच्या जगताची झलक पाहण्याची संधी देखील मिळेल.
राष्ट्रीय फेरी पूर्ण झाल्यावर नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे होणार्या आंतरराष्ट्रीय फेरीत सहभागी होणारा "भारतीय संघ" तयार करण्यासाठी ज्युरी सर्व अंतिम स्पर्धकांमधून दोन सर्वोत्तम क्विझर्सची निवड करतील.
आंतरराष्ट्रीय फेरीसाठी, सर्व G20 सदस्य राष्ट्रांसह आणखी 09 राष्ट्रांना आमंत्रणे देण्यात आली असून 23 आंतरराष्ट्रीय संघांनी 19 नोव्हेंबर 23 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वारस्य दर्शवले आहे. या प्रश्नमंजुषेची भव्य अंतिम फेरी नवी दिल्लीतील ऐतिहासिक इंडिया गेट येथे 23 नोव्हेंबर 23 रोजी होणार आहे. हा उपक्रम प्रतिभावंत शालेय विद्यार्थ्यांना बौद्धिक देवाणघेवाण आणि स्पर्धेसाठी जागतिक स्तरावर व्यासपीठ प्रदान करत आहे.
01 डिसेंबर 23 रोजी भारताने ब्राझीलला जी 20 अध्यक्षपद सोपवले असल्याने , G20 THINQ हा डिसेंबर 2022पासून देशात आयोजित महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या मालिकेचा शेवटचा कार्यक्रम असेल. जागतिक स्तरावर जी 20 च्या अनेक अद्वितीय कामगिरीचे साक्षीदार ठरलेल्या भारताच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा उल्लेखनीय समारोप समारंभ म्हणून काम करण्याचाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976715)
Visitor Counter : 122