भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भूविज्ञान मंत्रालयाने 62 ठिकाणच्या स्वच्छता मोहिमेसह सर्व सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि खासदारांच्या संदर्भाच्या बाबींवर तोडगा काढून विशेष मोहीम 3.0 यशस्वीपणे पूर्ण केली

Posted On: 13 NOV 2023 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023

भूविज्ञान मंत्रालयाने (MoES) नवी दिल्लीतल्या पृथ्वी भवन, येथील मुख्यालयासह देशातील विविध ठिकाणच्या दहा संस्थांमध्ये आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विशेष मोहीम 3.0 यशस्वीरित्या पूर्ण केली.

भारत सरकारच्या विशेष मोहीम 3.0 ची सुरुवात 2 ऑक्टोबर 2023 रोजी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आली. ही मोहीम 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू राहिली आणि या मोहिमेच्या माध्यमातून संस्थात्मक स्वच्छता (अर्थात स्वच्छतेची कामे) आणि सुशासनासंदर्भातील कामे जसे की सार्वजनिक तक्रारींचा निपटारा, भंगार, आणि न वापरलेल्या/बंद फायलींचा निफ्टारा, स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून कार्यालयातील जागांच्या स्वच्छतेबरोबर त्या मोकळ्या करण्यावर यावेळी भर देण्यात आला. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेशी निगडित अशी ही मोहीम होती.

या विशेष मोहीम 3.0 ची तयारी म्हणून, मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी, सप्टेंबर 2023 मध्ये, मंत्रालयाच्या मुख्यालय परिसराच्या स्थितीचा मंत्रालयातल्या  वरिष्ठ अधिकार्‍यांसह आढावा घेतला. भूविज्ञान मंत्रालयाने आणि मंत्रालयाशी संबंधित इतर संस्थांनी विशेष मोहिम 3.0 चा भाग म्हणून ऑक्टोबर 2023 या महिन्यात 62 ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या आणि या मोहिमेच्या माध्यमातून 7,375 चौरस फूट कार्यालयीन जागा मोकळी करण्यात मदत मिळाली. जनसेवेच्या भावनेने आणि जन भागिदारी (म्हणजे लोकसहभाग) ची कल्पना पुढे नेत, भूविज्ञान मंत्रालयाने शाळा, समुद्रकिनारे, बस स्टॉप, हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, तलाव, उद्याने इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिमे राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून निघालेल्या भंगाराची विल्हेवाट लावून मंत्रालयाला पाच लाख चार हजार तीनशे तेहतीस रुपये (INR 5,04,333/-) आर्थिक नफा झाला.

भूविज्ञान मंत्रालयांतर्गत नवी दिल्ली येथील लोधी रोडवरील पृथ्वी भवन या मुख्यालयासह पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसह पाच स्वायत्त संस्था, दोन अधीनस्थ कार्यालये आणि तीन संलग्न कार्यालये ज्यात महाराष्ट्रातील कराड येथील बोरहोल जिओफिजिक्स रिसर्च प्रयोगशाळा (BGRL) इत्यादी संस्थां समाविष्ट आहेत.

 

S.Tupe/V.Yadav/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1976639) Visitor Counter : 98


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu