विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

CSIR-NIScPR ने साजरा केला आठवा आयुर्वेद दिवस

Posted On: 13 NOV 2023 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023

आठव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने (9 नोव्हें. 2023) सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (सीएसआयआर-एनआयएससीपीआर), अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्थेने आपल्या स्वस्तिक (SVASTIK) उपक्रमाचा भाग म्हणून, केंद्र सरकारच्या सहकार्याने "जीवनशैलीतील बदलांमुळे होणाऱ्या विकारांमध्ये आयुर्वेदाची भूमिका" या विषयावर आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) येथे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. सीएसआयआर-एनआयएससीपीआर चे मुख्य शास्त्रज्ञ आर.एस.जयासोमू यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जयसोमु यांनी आयुर्वेदाची आपल्या दैनंदिन जीवनाबरोबर विशेषत: सध्याच्या प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सीएसआयआर-एनआयएससीपीआर चे शास्त्रज्ञ डॉ परमानंद बर्मन यांनी प्रमुख वक्त्या डॉ साक्षी शर्मा, संशोधन अधिकारी (आयुर्वेद), केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, नवी दिल्ली यांचा परिचय करून दिला. आपल्या मुख्य भाषणात, डॉ शर्मा यांनी आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेपेक्षा चांगल्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या गरजेवर भर दिला. याशिवाय, त्यांनी पारंपारिक ज्ञानाचे महत्त्व आणि प्रथम एखाद्याच्या जीवनशैलीचे मूल्यमापन न करता औषध उपचार पद्धतीचा अवलंब करण्याच्या प्रचलित पद्धतीबद्दल भीती व्यक्त केली. या माहितीपूर्ण व्याख्यानामध्ये, प्रकृती, आयुर्वेद घड्याळ, आहार पद्धती आणि तणाव-संबंधित आरोग्य समस्या कमी करण्यासाठी धोरणे अशा आयुर्वेदाच्या विविध पैलूंचा समावेश होता. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. सीएसआयआर-एनआयएससीपीआर मधील मुख्य शास्त्रज्ञ तसेच स्वस्तिक उपक्रमाच्या समन्वयक डॉ चारू लता यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच वक्ते आणि श्रोत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप सीएसआयआर-एनआयएससीपीआर च्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुमन रे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराने झाला.

 

S.Tupe/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976634) Visitor Counter : 139