सांस्कृतिक मंत्रालय
संस्थात्मक स्वच्छता आणि कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणारी विशेष मोहीम 3.0 सांस्कृतिक मंत्रालयाने यशस्वीरित्या केली पूर्ण
Posted On:
11 NOV 2023 12:57PM by PIB Mumbai
सांस्कृतिक मंत्रालयाने (MoC), आपल्या विविध संघटनांसह, विशेष मोहिम 3.0 मध्ये सहभाग घेऊन मुख्यत्वे करून संस्थात्मक स्वच्छता आणि सरकारी कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले.
या विशेष मोहिमेच्या 2 ते 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंतच्या अंमलबजावणीच्या टप्प्यात, मंत्रालयाने सर्व निश्चित केलेले 449 विभाग आणि लेखा व्यवस्थापनामध्ये स्वच्छता मोहीम राबवून 100% उद्दिष्ट साध्य केले: या मोहिमेदरम्यान सर्व 15,969 प्रत्यक्ष फायलींचे आणि 2133 ई- फायलींचे पुनरावलोकन केले गेले, त्यापैकी 4975 प्रत्यक्ष फायली आणि 1620 ई-फायली मार्गी लावून त्या बंद केल्या गेल्या आहेत. याशिवाय, नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (NAI) अर्थात भारताच्या राष्ट्रीय पुराभिलेख संस्थेत हस्तांतरित करण्यासाठी 138 प्रत्यक्ष फायलींची निवड करण्यात आली. यावेळी गोळा झालेला अनावश्यक भंगार विक्री करून मंत्रालयाला 42,15,715/- रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय या मोहिमेच्या माध्यमातून एकूण 22272 चौ.फू. क्षेत्र खुले करण्यात आले, या विशेष मोहिमेच्या दरम्यान गाठलेल्या इतर उद्दिष्टांमध्ये 83% सार्वजनिक तक्रारींचा निपटारा करणे समाविष्ट आहे; यातल्या 81.8% तक्रारी या पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित; 67.8% राज्य सरकार संबंधित; 64.2% खासदारांशी संबंधित आणि 51% संसदेच्या कामकाजा संदर्भात आहेत. या मोहिमेदरम्यान मंत्रालयाने 8 प्रसिद्धीपत्रक जारी केले आहेत. शिवाय, मंत्रालय आणि मंत्रालयाशी संबंधित विविध संस्थांकडून 173 ट्विटही करण्यात आले आहेत.
आपल्याकडील नोंदींच्या पुनर्संचयित संवर्धनाचा एक भाग म्हणून, भारताच्या राष्ट्रीय पुराभिलेख संस्थेने संग्रहात असलेल्या 21,425 पत्रके, 140 फाईल्स आणि 45 खंडांच्या नोंदीमध्ये दुरुस्त्या केल्या.
भारताच्या राष्ट्रीय पुराभिलेख संस्थेने (NAI) विशेष मोहीम 3.0 दरम्यान लेखा व्यवस्थापनासाठी खालील प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केले:-
1. दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत विविध मंत्रालये/विभाग, संलग्न/अधिन्य कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या एककांमध्ये (PSUs) गट ब आणि त्यावरील आणि समकक्ष स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी लेखा व्यवस्थापनातील अभिमुखता अभ्यासक्रम;
2. दिनांक 23.10.2023 रोजी मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या गट अ आणि ब आणि समकक्ष स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी लेखा व्यवस्थापना संदर्भात विशेष प्रशिक्षण सत्र.
3. भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांनी नव्याने नियुक्त केलेल्या अभिलेख अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, दिनांक 30 ऑक्टोबर 2023 आणि 1 नोव्हेंबर 2023 रोजी एनएआय रेकॉर्ड सेंटर, पुडुचेरी येथे आयोजित करण्यात आला.
सांस्कृतिक मंत्रालयाने 28 ते 31 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत ललित कला अदामी, 35 फिरोजशाह रोड, मंडी हाऊस, नवी दिल्ली येथे "वेस्ट टू आर्ट" - "स्क्रॅप टू स्कल्पचर" या संकल्पनेवर आधारित एक प्रदर्शन देखील आयोजित केले होते.
ज्याच्या माध्यमातून विशेष मोहीम 3.0 दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयाने आणि मंत्रालयाशी संबंधित विविध संघटनांनी केलेल्या कार्याचे प्रदर्शन करण्यात आले.
***
Jaydevi PS/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976356)
Visitor Counter : 83