गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी मुंबई महानगरपालिकेचा दिवाळीनिमित्त निराळ्या पद्धतीने केला हरीत संकल्प

Posted On: 10 NOV 2023 12:22PM by PIB Mumbai

 

सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या(MoHUA)नेतृत्वाअंतर्गत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळीही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि हरित पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत  आहे.नवी मुंबईकर या चळवळीला मनापासून स्वीकारत असून नवी मुंबईत शॉपिंग मॉल्स मधून सुरू केलेल्या सेल्फी मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना मॉल्समध्ये जाण्यासाठी आकर्षित करत आहे.दुसऱ्या स्वच्छ भारत मिशन- शहर अभियान (2.0) अंतर्गत 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' मोहिमेचा एक भाग असलेल्या स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी खरेदीदारांना स्वाक्षरी मोहीमेत (साइन अप) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर ते मॉलमधील सेल्फी पॉइंट्सवरून  स्वच्छ दिवाळी सेल्फीद्वारे आपली पर्यावरणाबाबत जागरूकता आणि स्वच्छता यासह  दिवाळी साजरी करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करु शकतात. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी साइन अप केलेल्या नागरिकांना खरेदीसाठी सवलतीच्या दरातील भेटकूपन  ही दिली जात आहेत, ज्यामुळे निवड करणाऱ्यांमधे सकारात्मक  मनोभावना निर्माण  होत आहे.हा  एक अनोखा उपक्रम असून त्यात नागरिकांचा समावेश असून स्वच्छतेच्या वचनबद्धतेसह उत्सवाचे प्रतिबिंब त्यातून दिसून येत आहे.

ही मोहीम केवळ नागरीकांना जनआंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत नाही तर स्वच्छ दिवाळीसाठी त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व म्हणूनही काम करत आहे. या प्रयत्नात नवी मुंबईकर एकत्र आल्याने, स्वच्छ दिवाळी 'शुभ दिवाळी' ही केवळ मोहीम बनली नाही तर  ती -हरीत, स्वच्छ आणि अधिक शाश्वत पध्दतीने सणासुदीचे दिवस साजरे करण्याच्या सामूहिक चळवळीत बदलले आहे.

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976108)
Read this release in: English , Urdu , Tamil