आयुष मंत्रालय
शिक्षण, संशोधन, उत्पादने आणि सेवा या माध्यमातून आयुर्वेद वैद्यकीय प्रणालीचे वस्त्र जागतिक स्तरावर विणले जात आहे: केंद्रीय आयुष मंत्री
आयुष मंत्रालयाने आयोजित केली देशातील आठ राज्यांची राष्ट्रीय आयुष मिशन आढावा बैठक
Posted On:
09 NOV 2023 5:06PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालय शिक्षण, संशोधन, उत्पादने आणि सेवा या माध्यमातून जागतिक स्तरावर एक संघटित आयुर्वेद प्रणाली तयार करत असल्याचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हरियाणातील पंचकुला येथे आठव्या आयुर्वेद दिन महापर्व संदर्भात आयोजित परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलताना सांगितले. आयुर्वेदिक उपचार पद्धती आपल्या हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचा भाग आहे आणि प्राचीन काळापासून भारताच्या समाजात, शिक्षणात, सेवांमध्ये आणि जीवनशैलीत ही पद्धती अस्तित्वात आहे, असेही ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या जी 20 बैठकीत भारताने सदस्य देशांना 'वसुधैव कुटुंबकम' हा संदेश दिला. त्याला सर्वांची संमती मिळाली आणि जी 20 जाहीरनाम्याद्वारे याला अभूतपूर्व यश मिळाले, असे सोनोवाल यांनी सांगितले. सतत नवनवीन प्रयोग करून पुढे जाण्याच्या भावनेतूनच आयुषचा विकास झाला असून याच भावनेने भारताला विकसनशील देशातून जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत परावर्तीत केले आहे, असेही ते म्हणाले.

तरुण आणि सामान्य लोक कृषी, फलोत्पादन आणि पशुवैद्यकीय औषधांशी संबंधित आयुर्वेदिक उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन करून यशस्वी स्टार्टअप तयार करू शकतात. अशा स्टार्टअप्सच्या निर्मिती आणि प्रगतीमुळे भारताची अर्थव्यवस्था स्वावलंबी अर्थव्यवस्था बनून मजबूत होईल.
'आयुर्वेद दिना'च्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मुंजपारा म्हणाले की, 'आरोग्य' सेवेचा विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मुंजपारा यावेळी म्हणाले. आयुर्वेद औषधांची विशेष बाब म्हणजे या पद्धतीत निरोगी राहण्यासाठी लोकसहभागावर भर दिला जातो. आयुर्वेदाला जीवनशैलीचा एक भाग बनवून आरोग्य क्षेत्रातील सेवा वितरण अधिक बळकट करता येईल, असेही ते म्हणाले.
आयुर्वेद हा ज्ञानाचा कधीही न संपणारा खजिना आहे जो काळ आणि संस्कृतीनुसार पुढे चालत राहतो, असे आयुष मंत्रालयाचे सचिव तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा म्हणाले.
‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशासह आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या महिनाभर चाललेल्या जागतिक मोहीमेची आज सांगता झाली. जगभरातील कोट्यवधी लोक या मोहिमेत सामील झाले आणि त्यांनी आयुर्वेदाद्वारे मानव, प्राणी, पर्यावरण आणि वनस्पती कशा प्रकारे निरोगी राहू शकतात तसेच एक अनोखी आयुर्वेद प्रणाली कशा प्रकारे निर्माण केली जाऊ शकते हे जाणून घेतले.
या परिषदेसोबतच 'आयुर्वेद महापर्व' एक्स्पो आणि आठ राज्यांच्या राष्ट्रीय आयुष मिशनच्या (NAM) आढावा बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात देशभरातील आयुर्वेद उत्पादनांचे उत्पादक, स्टार्ट अप आणि आयुर्वेद व्यावसायिकांनी आपली उत्पादने मांडली होती. उद्या 10 नोव्हेंबर रोजी धन्वंतरी दिनानिमित्त आठव्या आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा पंचकुला येथील इंद्रधनुष सभागृहात होणार आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975991)
Visitor Counter : 129