आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य संशोधन विभागामध्ये विशेष मोहीम 3.0 अंतर्गत महत्त्वपूर्ण कामगिरी
Posted On:
09 NOV 2023 4:34PM by PIB Mumbai
आरोग्य संशोधन विभाग (डीएचआर), आयसीएमआर आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या संस्था आणि बहुविद्याशाखीय संशोधन विभाग आणि आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन विभाग, व्हीआरडीएल विभागांनी 2 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान आरोग्य संशोधन विभाग सचिवांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम 3.0 यशस्वीपणे राबवली. आरोग्य संशोधन विभागाच्या दोन्ही संयुक्त सचिवांनी मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवले होते. 01.10.2023 रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. सर्व उपक्रम 01.10.2023 रोजी अंमलात आणण्यात आले आणि या उपक्रमांची छायाचित्र ,गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयासह पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे प्रशासित संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आली.
विशेष मोहीम 3.0 अतिशय यशस्वी ठरली. मोहिमेदरम्यान, खासदारांचे संदर्भ, संसदीय आश्वासने, सार्वजनिक तक्रारी, पंतप्रधान कार्यालयाचे संदर्भ आणि नोंदी /नस्तींचा आढावा आणि त्याद्वारे कामाच्या ठिकाणच्या वातावरण सुधारण्यासाठी प्रलंबितता कमी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
मोहिमेचा एक भाग म्हणून, 257 प्रत्यक्ष फाईलींचा आढावा घेण्यात आला त्यापैकी 78 बंद करण्यासाठी निश्चित करण्यात आल्या. आणि 78 फाईली बंद करण्यात आल्या. सार्वजनिक तक्रारींची प्राधान्याने दखल घेण्यात आली आणि एकूण 123 सार्वजनिक तक्रारी आणि 5 सार्वजनिक तक्रारींचे अपील निकाली काढण्यात आले. आरोग्य संशोधन विभाग आणि 10 बहुविद्याशाखीय संशोधन विभाग आणि आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली . या मोहिमे दरम्यान खासदारांचे संदर्भ निकाली काढण्याचे प्रमाण 70% होते. आरोग्य संशोधन विभागामध्ये असलेल्या भंगार सामग्रीची विल्हेवाट लावून महसूल प्राप्त करण्यात आला. मोहिमे दरम्यान आयसीएमआर अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये स्वच्छता पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975983)
Visitor Counter : 102