वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीकडे वाटचाल करत आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यात पोलादाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 07 NOV 2023 3:01PM by PIB Mumbai

 

भारत आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीकडे वाटचाल करत असल्याचे आणि  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  पोलाद महत्त्वपूर्ण असल्याचे  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे चौथ्या 'आयएसए स्टील कॉन्क्लेव्ह 2023’ला संबोधित करत होते. वर्ष  2030 पर्यंत वर्षाला 300 दशलक्ष टन पोलाद उत्पादनाची आकांक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्बन सीमा समायोजन यंत्रणा (सीबीएएम ) संबंधित चिंतेचे निराकरण  करताना गोयल यांनी सांगितले की भारत सरकारने हा मुद्दा युरोपिअन संघ आणि जागतिक व्यापार संघटनेसमोर उपस्थित केला आहे.  त्यांनी भारतीय उत्पादक आणि निर्यातदारांना न्याय्य वागणूक देण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि पोलाद उद्योगाला हानी पोहोचवू शकणार्‍या अयोग्य कर किंवा आकारणीला विरोध करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

विकसित देशांमध्ये  पोलाद उद्योगाकरिता  मुक्त व्यापार करारासाठी  केलेल्या प्रयत्नांचा  गोयल यांनी उल्लेख केला आणि व्यापार करारांमध्ये मूल्यवर्धन व  बौद्धिक संपदा यांच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी देशातील  एमएसएमई क्षेत्रासाठी उद्योग क्षेत्राच्या पाठबळाचे कौतुक केले  आणि ते कायम ठेवण्याचे  आवाहन केले.

देशातील  पोलाद उद्योग सध्या सुमारे वीस लाख लोकांना रोजगार पुरवत राष्ट्रीय जीडीपीमध्ये भरीव योगदान देत असल्याचे गोयल यांनी सांगितले.  या क्षेत्राच्या वाढत्या गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न भारत करत असून पोलाद उद्योग आत्मनिर्भरतेत उल्लेखनीय वृद्धी करू शकतो, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

सरकार, उद्योग आणि ग्राहक यांच्यातील सहयोगी दृष्टिकोनाच्या महत्त्वावर पीयूष गोयल यांनी  भर दिला. त्यांनी भारतातील दरडोई पोलादाच्या वापरासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्याच्या गरजेवर भर दिला आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योजकांना  नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पद्धतींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

ब्रँड इंडिया प्रोजेक्टसाठी पोलाद उद्योगाच्या पाठिंब्याची गोयल यांनी प्रशंसा केली आणि  आपली क्षमता दाखवण्यासाठी आगामी प्रदर्शनांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

***

S.Kane/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975455) Visitor Counter : 72