ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांच्या  दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 06 NOV 2023 4:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील त्यांच्या समकक्षांची भेट घेतली आणि देशातील वाढत्या ऊर्जेची  मागणी पूर्ण करण्यासाठी उचलल्या जाणार्‍या पावलांवर आपले मत मांडत  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीचे हे चिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले.  नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 6 ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. जर आपण ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले नसते तर भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली नसती याकडे त्यांनी लक्ष वेधले.  आर्थिक वृद्धी  उर्जा क्षेत्रावर अवलंबून आहे. ऊर्जा क्षेत्र हे देशाच्या प्रगतीची  मूलभूत प्रेरक शक्ती आहे.”, असे ते म्हणाले.

आगामी कॉप -28 बैठकीत कोळशाचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे, मात्र, भारत आपल्या विकासासाठी वीज उपलब्धतेबाबत तडजोड करणार नाही,असे ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांबाबत बोलताना त्यांनी सांगितले.

वाढत्या मागणीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्व वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आवश्यक आहे हा सरकारने विचार केलेला एक मार्ग आहे, असे सिंह यांनी सांगितले.  जर काही राज्ये त्यांची ऊर्जा संयंत्रे सर्वाधिक मागणी असताना  चालवत नसतील, तर आम्ही केंद्रीय संचयामधून ही उणीव भरून काढू शकणार  नाही , आपली सर्व संयंत्रे चालतील  आणि आपली संयंत्रे  पूर्ण क्षमतेने चालतील हे सुनिश्चित करण्यावर  आपल्याला  लक्ष केंद्रित करावे लागेल.”, असे मंत्री म्हणाले.

देशांतर्गत कोळशाचा वापर आणि देशांतर्गत कोळशाची आवक यातील तफावत हे आणखी एक आव्हान आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. मला खात्री आहे कीकोल इंडियाने उत्पादन वाढवले असेल, मात्र आपली  मागणी वेगाने वाढत  आहे, असे ते म्हणाले.  यामुळे टंचाई निर्माण झाली आहे आणि म्हणूनच आपल्याला  6% मिश्रण करणे आवश्यक आहे. एनटीपीसी आणि डीव्हीसी मिश्रण करत आहेत, राज्यांनीही कोळशाच्या कमतरतेनुसार मिश्रण केले पाहिजे.असे त्यांनी सांगितले.

कोळशाची  लांब पल्ल्याची  वाहतूक आणि रेकच्या उपलब्धतेशी संबंधित समस्या उद्भवू नयेत यासाठी राज्यांना कोळसा पट्ट्याजवळ नवीन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे आवाहन  मंत्र्यांनी  यावेळी  केले.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1975168) Visitor Counter : 60