निती आयोग
जी20 नवी दिल्ली घोषणापत्रातील तरतुदीनुसार, “समृद्धीसाठी सर्वसमावेशक व्यापार” या विषयावर नीती आयोग आयोजित करणार कार्यशाळा
एकात्मिक व्यापाराच्या क्षेत्रात देशांतर्गत व्यापाराची व्याप्ती वाढवणे, मालकी आणि निष्कर्षांची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने कार्यशाळेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2023 2:52PM by PIB Mumbai
नीती आयोगाने, उद्या म्हणजेच 6 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत ताज हॉटेल इथे “समृद्धीसाठी एकात्मिक व्यापार’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा जी-20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रात (एनडीएलडी) चर्चा झालेल्या विविध विषयांवर आयोजित केलेल्या 10 पूरक विषयावरील कार्यशाळांच्या मालिकेचा एक भाग आहे.
ही कार्यशाळा विषय तज्ञ, विचारवंतांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर भागधारकांसाठी विकास आणि समृद्धीसाठी सर्वसमावेशक व्यापाराच्या क्षेत्रात देशांतर्गत व्यापाराची व्याप्ती वाढवणे, मालकी आणि निष्कर्षांची अंमलबजावणी करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
या कार्यशाळेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि लवचिक अशा जागतिक मूल्यसाखळीला चालना देण्यासाठी जागतिक मूल्य साखळ्यांचे मॅपिंग, सर्वसमावेशक व्यापार, बिगर-शुल्क उपाययोजनामध्ये पारदर्शकता (एनटीएम); व्यापार वित्तपुरवठा; बाजारपेठेतील प्रवेश; जिल्ह्यास्तरीय निर्यातीला प्रोत्साहन; एमएसएमई आणि इतर घटकांचे एकत्रीकरण सुलभ करणे अशा विषयांवर व्यापक चर्चा होईल.
खाली सांगितलेल्या सत्रामध्ये ढोबळमानाने उल्लेख करण्यात आलेल्या विविध विषयांवर चर्चा होईल :
जागतिक मूल्य साखळ्यांचे मॅपिंग (GVCs): या सत्रात, मूल्य साखळी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठीचे मार्ग आणि पद्धती, तसेच या मूल्य साखळी अंतर्गत, व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे, एकात्मिक, शाश्वत आणि लवचिक जागतिक मूल्य साखळीला कसे प्रोत्साहन देता येईल, यावर चर्चा होणार आहेत.
वृद्धीसाठी सर्वसमावेशक व्यापाराला प्रोत्साहन: विकसनशील देशांना, विशेषतः अल्पविकसित देशांना सक्षम करण्यासाठी 'व्यापारासाठी मदत' उपक्रमावर चर्चा होईल. समर्थन आणि सातत्यपूर्ण व्यापार आणि पर्यावरण धोरणे सक्षम करून बिगर-शुल्क उपायांमध्ये पारदर्शकतेला प्रोत्साहन कसे द्यावे आणि बिगर-शुल्क अडथळे कमी कसे करावे, यावर चर्चा होईल.
सर्वसमावेशक व्यापारासमोरील आव्हाने : एमएसएमई क्षेत्राच्या अंतर्भावाची व्यवस्था करणे, व्यापारात विविधता आणि बाजारपेठेचा विस्तार, जिल्हा स्तरावरून निर्यातीला चालना आणि सेवा निर्यातीला गती देणे.
1 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दहा पूरक विषयावरील कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. कार्यशाळांच्या संकल्पनांमध्ये जी-20 ते जी-21, विकासासाठी डेटा, पर्यटन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, उद्दिष्टे, व्यापार, विकासाचे भारतीय मॉडेल, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, बहुपक्षीय विकास बँकांमध्ये सुधारणा आणि हवामान वित्त आणि हरित विकास यांचा समावेश आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974853)
आगंतुक पटल : 149