निती आयोग
नीती आयोगाची जी-20 कार्यशाळा मालिका – शाश्वत विकास उद्दिष्टप्राप्तीला वेग देण्यासाठी विकासाच्या डेटाचा उपयोग
Posted On:
04 NOV 2023 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली जी-20 नेत्यांच्या घोषणापत्र (एनडीएलडी )2023 मधील कार्यक्रमाला पुढे नेत, शाश्वत विकास उद्दिष्टप्राप्तीसाठी विकासाच्या डेटाचा उपयोग या संकल्पनेवर विचार विचारविनिमय करण्यासाठी जगभरातील प्रमुख विचारवंत, अभ्यासक आणि बहुपक्षीय संस्था नवी दिल्लीत एकत्र आले आहेत. नीती आयोगासोबत भागीदारी करत, दिल्लीतील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. एनडीएलडी 2023 मधील अंतर्भूत कृतीसाठी नीती आयोगाने आयोजित केलेल्या विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यशाळांच्या मालिकेतील ही एक कार्यशाळा आहे. इतर कार्यशाळांच्या संकल्पना, पर्यटन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, विकासाचे भारतीय मॉडेल अशा होत्या. सामूहिकरित्या, ह्या संकल्पना, नियोजित राष्ट्रीय कार्यशाळेसाठी मुद्दे/माहिती संकलित करणाऱ्या ठरल्या आहेत.
ताज पॅलेसमध्ये झालेल्या या धुरीणांच्या संमेलनात, विकासासाठी डेटाच्या सात तत्वांवर आधारित चार संकल्पना मांडण्यात आल्या ज्यावर सांगोपांग चर्चा झाली. ही चर्चा, त्या संकल्पनांची प्रासंगिकता, विशिष्ट मिती, आणि भारतीय संदर्भात विकासासाठी डेटाचा उपयोगाविषयीची जी-20 तत्वे यावर भर देणारी होती.
नीती आयोगाचे सदस्य, डॉ. अरविन्द वीरमणी, यांच्या प्रास्ताविकाने ह्या कार्यशाळेची सुरुवात झाली. त्यांनी डेटाचे ऐतिहासिक महत्व आणि निर्णय तसेच कृतीतील त्यांचा उपयोग समजावून सांगितला. एक सुदृढ, मजबूत डेटा व्यवस्था उभारण्याचे महत्त्व, सतत उन्नत होत जातील अशी डेटा संसाधने आणि निर्णयासाठीचा डेटा आणि डेटा संकलनाच्या मार्गातील मुद्दे अशा सर्वांचा विचार करण्याची गरज यावर त्यांनी भाष्य केले.
या कार्यशाळेत, अनेक व्यापक मुद्यांचा परामर्श घेण्यात आला, असे मुद्दे, जे शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विकासासाठी डेटाचा उपयोग या तत्वासंदर्भात प्रासंगिक आहेत, यावर चर्चा झाली. या चर्चेतून, अनेक महत्वाच्या संकल्पना उदयास आल्या. ज्यात, डेटाचा वापर कोण करत आहे, कोणाचा विकास महत्त्वाचा आहे, विकासासाठी डेटाचा वापर तयार करतांना, कोणाचा विकास महत्त्वाचा आहे, डेटाचा अर्थ कोण लावू शकेल, आणि कोण त्यासाठी सक्षम आहे, जगाला संतुलित सार्वजनिक डेटा तयार करण्यात मदत करण्यासाठी भारताने नेतृत्व का करावे, डिजिटल डेटा प्रणाली, ही पारंपरिक कागदी आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीचा डिजिटल अवतार म्हणून मर्यादित का राहायला नको, उदयोन्मुख डिजिटल डेटा आराखडा, डेटा गुणवत्तेशी संबंधित आव्हाने, डेटा वर अति किंवा कमी अवलंबित्व असल्यास त्याची आव्हाने, एआय/एमएल साधनांची बलस्थाने आणि मर्यादा, नवी तंत्रज्ञाने आणि व्यवस्था कशाप्रकारे सगळे काही बदलत आहेत यावर विचारमंथन झाले.
सुमारे 20 संस्थांचे प्रतिनिधी या सखोल चर्चेत सहभागी झाले होते.
या कार्यशाळेतून एक फलनिष्पत्ती आराखडा तयार केला जाईल, ज्यात भारताच्या संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टावरील प्रगतीला गती देण्यासाठी विकासासाठी डेटा वापरण्याच्या मार्गावर चर्चा केली जाईल. हा आराखडा, आगामी राष्ट्रीय कार्यशाळेसाठी माहिती म्हणून उपयुक्त ठरेल.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974765)
Visitor Counter : 106