निती आयोग
'परिवर्तनशील तंत्रज्ञान - डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे विकास, वाढ आणि नवोन्मेषी कल्पनांना चालना' या विषयावरील कार्यशाळेचे नीती आयोगाद्वारे आयोजन
Posted On:
04 NOV 2023 2:19PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी, नीति आयोग 'परिवर्तनशील तंत्रज्ञान - डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे (DPIs) विकास, वाढ आणि नवोन्मेषी कल्पनांना चालना देणारी कार्यशाळा आयोजित करत आहे. जी 20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रामध्ये (NDLD) निर्देशित केलेल्या 10 संकल्पनांवर आयोजित जी 20 फीडर संकल्पनात्मक कार्यशाळांच्या मालिकेतील ही चौथी कार्यशाळा असेल. ही कार्यशाळा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) सहकार्याने आयोजित केली जात आहे.
ही कार्यशाळा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा क्षेत्रामधील तज्ञ, उद्योजक, नवोन्मेषक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत प्रतिनिधी आणि सरकार यांच्या विविध दृष्टिकोनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. ही कार्यशाळा जी 20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रामध्ये नमूद केलेली उद्दिष्टे आणि परिणाम साध्य करण्यासाठी पुढील मार्ग आणि आवश्यक संसाधने यांचा मागोवा घेईल.
ही कार्यशाळा चार भागांमध्ये विभागली जाईल – लोकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख, देयके: डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे, डेटा सक्षमीकरण आणि संरक्षण आर्किटेक्चर (DEPA): भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारुप विकसित करणारे राष्ट्र बनण्यास मदत करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे नेतृत्वाचा दृष्टीकोन, नव्या संधी खुल्या करणे: ओपन नेटवर्क्सची शक्ती
ही कार्यशाळा, कायदेशीर चौकटीचा आदर करत, उद्योग, शैक्षणिक, तज्ञ आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींना सर्व देशांत सक्षम, समावेशक, मुक्त, निष्पक्ष, भेदभावरहित, सुरक्षित आणि लवचिक डिजिटल अर्थव्यवस्था लागू करण्यासाठी सहयोग देणे आणि मार्गदर्शक आराखडा तयार करणे यासाठी एक संधी असेल.
अशा प्रकारच्या सुमारे दहा फीडर संकल्पनात्मक कार्यशाळा 1 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित केल्या जात आहेत.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974714)
Visitor Counter : 103