आयुष मंत्रालय
आयुष स्टार्टअप्सने विकसित केलेल्या ‘आयुष आहार’ उत्पादनांचे ‘वर्ल्ड फूड इंडिया’मध्ये प्रदर्शन
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2023 4:42PM by PIB Mumbai
- आयुष मंत्रालय 3, 4 आणि 5 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमात भागीदार म्हणून सहभागी होणार आहे.
- देशभरातील आयुष स्टार्ट-अप नव्याने विकसित केलेली आयुष आहार उत्पादने प्रदर्शनात मांडतील.
- वर्ल्ड फूड इंडिया 30 हून अधिक नवनिर्मित आयुष उत्पादने प्रदर्शित करेल.
वर्ल्ड फूड इंडिया 2023 सोहोळ्यात आयुषच्या नाविन्यपूर्ण आयुष आहार उत्पादनांचे प्रदर्शन केले जाईल. प्रगती मैदानावरील आयुष मंत्रालयाच्या दालनात देशभरातील स्टार्ट-अप आपली उत्पादने मांडतील. प्रदर्शनात एकूण 18 स्टार्ट-अप 30 हून अधिक आयुष उत्पादने प्रदर्शित करतील.
वर्ल्ड फूड इंडियामध्ये आयुष आहार या विषयावर एक विशेष सत्रही आयोजित केले जाईल. या सत्रात आयुष आहाराचे महत्त्व, आयुष आहाराचे आरोग्यविषयक फायदे इत्यादींवर चर्चा केली जाईल. आयुर्वेद हा जगभरातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याच्या प्रयत्नांवरही या सत्रात चर्चा होईल. आयुष क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी केलेले प्रयत्न, युनिकॉर्नशी सल्लामसलत आणि आयुष क्षेत्रात येणारे नवीन स्टार्ट अप यावर सविस्तर विचारमंथन होईल.
आयुष उत्पादनांच्या जागतिक विक्री आणि विपणनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. वर्ल्ड फूड इंडियाच्या विशेष सत्रात आयुष उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेची निवड, बाजारपेठांचा शोध आणि भारतातून आयुष उत्पादनांच्या निर्यातीची व्यवस्था बळकट करणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आयुष मंत्रालयाने केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेची (सीसीआरएच) ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. वर्ल्ड फूड इंडिया सोहोळ्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए), राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जयपूर, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे, सीसीआरएएस, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, आयुषेक्सिल (आयुष एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल) आणि इन्व्हेस्ट इंडिया परिश्रम आणि संसाधनांच्या माध्यमातून योगदान देत आहेत.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974281)
आगंतुक पटल : 216