ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
चालू खरीप विपणन हंगाम 2023-24 मध्ये 161.47 लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली असून देशातील 9.33 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे
प्रविष्टि तिथि:
02 NOV 2023 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 02 नोव्हेंबर 2023
देशात सध्या खरीप विपणन हंगाम (केएमएस) 2023-24 सुरळीतपणे सुरु आहे आणि 01 नोव्हेंबर 2023 पर्यंत 161.47 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आला आहे. या प्रक्रियेतून देशातील 9.33 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्यापोटी 35,571.14 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.
केएमएस 2023-24 (खरीपाची पिके) मध्ये 521.27 लाख टन तांदळाची खरेदी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यापैकी 20.76% म्हणजे 108.23 लाख टन तांदळाची खरेदी यायाधीच पूर्ण झाली आहे. यामध्ये पंजाब (66.42लाख टन), हरियाणा (36.11 लाख टन) आणि तामिळनाडू (3.26 लाख टन) या राज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974274)
आगंतुक पटल : 145