उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्त्री-पुरुष समानता हे कोणत्याही समानतेचे मूलतत्व  असून  स्त्री-पुरुष समानता नसेल तर समाजात समानता असू शकत नाही – उपराष्ट्रपती

Posted On: 02 NOV 2023 2:15PM by PIB Mumbai

 

स्त्री-पुरुष समानता हे कोणत्याही समानतेचे मूलतत्त्व आहे आणि स्त्री-पुरुष समानता नसेल तर समाजात समानता असू शकत नाही, यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी आज भर दिला. ही स्त्री-पुरुष समानता ही केवळ उदाहरणादाखल  नसून वस्तुस्थितीत असावी. आणि त्याची अभिव्यक्ती ही प्रत्यक्षात असायला हवी., असे ते म्हणाले. 'भारतीय संसदेत महिलांचे योगदान या विषयावर मिरांडा हाऊसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या  भाषणात उपराष्ट्रपतींनी हे नमूद केले. "संसदेत महिलांचे योगदान  प्रचंड आहे आणि त्यांची उपस्थिती कायदेमंडळातील वातावरणाला अधिक पोषक  करेल." हे धनखड  यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.

स्त्रिया त्यांच्या जीवनातील  बहुमूल्य अनुभव आणि त्यांनी तोंड दिलेली आव्हाने मांडू शकतात हे लक्षात घेता,  "यामुळे मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धोरणे विकसित करण्यात प्रशासनाला नक्कीच मदत होईल.", असे प्रतिपादन धनखड यांनी केले.

नारी शक्ती वंदन कायद्याला मंजुरी  ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगत , "हा एक महान घटनाक्रम असून    भारत@2047  जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा आपण  शिखरावर असू हे सुनिश्चित  करेल.", उपराष्ट्रपतींनी सांगितले. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली तेव्हा वरिष्ठ सभागृहात पीठासीन अध्यक्ष  म्हणून 17  महिला खासदारांची निवड केल्याचा उल्लेख करून, उपराष्ट्रपतींनी  विद्यार्थिनींना कधीही मागे न हटण्याचे आणि माघार न घेण्याचे  आवाहन केले. जग तुमचे आहे; जग तुमच्या माध्यमातून घडले पाहिजे. आज, भारतीय महिला जागतिक संस्थांमध्ये सत्ता  स्थानावर विराजमान आहेत,याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे ,” असे त्यांनी सांगितले.

आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी महिलाच  मोठा  त्याग करतात असे नमूद करत  "महिलांना न्याय देणे म्हणजे पुरुषांना   आपोआप न्याय देणे आहे , असे प्रतिपादन त्यांनी केले.  याचे  कारण महिला  सद्गुण, उदात्तता आणि सेवा यांचे उदाहरण आहेत, देवाने महिलांना  अशी क्षमता दिली जी  महिलांना  इतरांना मदत करण्याची संधी देते .”, असे त्यांनी सांगितले.

"जोपर्यंत भारतातील महिला सार्वजनिक जीवनात भाग घेत नाहीत, तोपर्यंत देशाचा उद्धार होऊ शकत नाही," या महात्मा गांधींच्या प्रतिपादनाचा   उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, आज आपल्या बापूंचे स्वप्न साकार होत आहे.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974255) Visitor Counter : 1864