कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त केंद्रीय दक्षता आयोगाद्वारे उद्या नवी दिल्ली येथे पॅनेल चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
01 NOV 2023 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी), दक्षता जागरुकता सप्ताह, 2023 चा भाग म्हणून उद्या नवी दिल्ली येथे “शिस्तविषयक कार्यवाही” या विषयावर पॅनेल चर्चा आयोजित करणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ज्या आठवड्यात येते, त्या आठवड्यात, सीव्हीसी दर वर्षी दक्षता जागरुकता सप्ताह साजरा करतो. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी सर्व भागधारकांना एकत्र आणून, दक्षतेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवण्याचे हे एक साधन आहे. यावर्षी 30 ऑक्टोबर ते 5नोव्हेंबर या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना आहे,
"Say no to corruption; commit to the Nation,
अर्थात- भ्रष्टाचाराचा विरोध करा, देशाप्रति समर्पित रहा”
पॅनेल चर्चेदरम्यान, शिस्तभंगाविरोधातील कारवाईच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा होईल. संबंधित क्षेत्रातील तज्ञ यावेळी माहिती देतील आणि सादरीकरण करतील.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973747)
Visitor Counter : 169