मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

कृषी भवन येथून केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा


देशाच्या अखंडतेसाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील आणि आपल्याला निरंतर प्रेरणा देईल-परशोत्तम रुपाला

Posted On: 31 OCT 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी आज कृषी भवनाच्या प्रांगणात 'एकता दौडला' हिरवा झेंडा दाखवला.  यावेळी मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान आणि डॉ. एल. मुरुगनही उपस्थित होते.

आपल्या भाषणात रुपाला यांनी, ''देशाच्या अखंडतेसाठी आणि दुग्ध व्यवसायासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील आणि आपल्याला निरंतर प्रेरणा देईल'', असे सांगितले. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत असून देशाच्या अखंडतेसाठी पटेल  यांच्या योगदानाबद्दल त्यांना  आदरांजली वाहण्यासाठी, मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे  150 हून अधिक अधिकारी यावेळी उपस्थित होते.  पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव  अलका उपाध्याय आणि मत्स्योद्योग विभागाचे सचिव, डॉ. अभिलाक्ष लिखी यांनी कृषी भवनाच्या प्रांगणापासून ते राजेंद्र प्रसाद मार्ग  आणि अशोका रस्तामार्गे हैदराबाद हाऊसपर्यंतच्या 'एकता दौड 'मध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

सर्व सहभागी व्यक्तींनी ,आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा जपण्याची वचनबद्धता व्यक्त करत,राष्ट्रीय एकता दिवस प्रतिज्ञा घेऊन एकता दौडला सुरुवात केली. 

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973370) Visitor Counter : 76