गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
16 वी अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद आणि प्रदर्शन 2023 ची आज झाली सांगता
Posted On:
29 OCT 2023 8:35PM by PIB Mumbai
16 वी अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद आणि प्रदर्शन 2023, हा शाश्वत शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी विविध पर्याय विकसित करण्याकरता समर्पित असलेला प्रमुख कार्यक्रम, त्याच्या समापन सत्रासह उच्च फलनिष्पत्तीने संपन्न झाला. या कार्यक्रमाला गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विकास कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
समापन सत्रात बोलतांना, मनोज जोशी यांनी, संपूर्ण कार्यक्रमात झालेल्या प्रमुख विषयांवरील चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण यांचा आढावा घेतला. त्यांनी ट्रान्झिट ओरिएंटेशन डेव्हलपमेंट (TOD) अर्थात महानगरांमध्ये सर्व प्रमुख केंद्र, वाहतूक व्यवस्थेच्या कक्षेत आणण्याची गरज आणि त्याबाबत निगडीत आव्हाने यावर भर दिला.
प्रवाशांसाठी पैसे देण्याचे सोयीस्कर आणि कार्यक्षम साधन म्हणून स्मार्ट कार्डचे असलेले महत्त्व, जोशी यांनी यावेळी विषद केले. शहरी वाहतुकीच्या विविध पद्धतींची परस्पर कार्यक्षमता वाढवण्याची क्षमता असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा अवलंब करण्यावर, सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले.
प्रभावी भाडे संकलन प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करताना मनोज जोशी म्हणाले की, व्यवहार्य वाहतूक व्यवस्थेसाठी चांगले भाडे संकलन महत्त्वाचे आहे. या प्रकल्पांचा चांगला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, रस्त्यांच्या आजुबाजूला असलेल्या परिसराचा उपयोग करण्याबद्दलही त्यांनी ऊहापोह केला.
समापन सत्रात, "शहरी वाहतुकीतील उत्कृष्ट व्यवस्था/सर्वोत्तम सेवा पुरवठा" विजेत्या राज्य/शहर प्राधिकरणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, सर्वोत्कृष्ट नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट (एनएमटी) अर्थात प्रदूषण रहीत वाहतूक व्यवस्था असलेल्या शहराचा पुरस्कार मिळाला. तर, शेजारच्याच पिंपळे सौदागर वसाहत प्रकल्पासाठी सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पुरस्कारही, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) त्यांच्या मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 च्या 30 स्थानकांसाठी असलेल्या मल्टी मॉडेल इंटिग्रेशन प्रोजेक्टसाठी पुरस्कार मिळाला.
पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या.
***
S.Kane/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972894)
Visitor Counter : 129