पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणतर्फे  3-5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथे “मूक संभाषण: फ्रॉम मार्जिन टू द सेंटर” या कला प्रदर्शनाचे आयोजन

Posted On: 29 OCT 2023 4:31PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सांकला फाऊंडेशनच्या सहकार्याने नवी दिल्लीतील भारत हॅबिटॅट सेंटर येथे 3 नोव्हेंबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मूक संभाषण: फ्रॉम मार्जिन टू द सेंटरनावाचे कला प्रदर्शन आयोजित केले आहे.  3 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4:00 वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि संकल्प फाऊंडेशन या कला प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मानवंदना अर्पण करत आहेत. प्रोजेक्ट टायगर हा भारतातील  वन्यजीव संवर्धन उपक्रम आहे जो 1973 मध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या बंगाली वाघाचे संरक्षण आणि जतन करण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरू करण्यात आला होता. मागील दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट कमी करण्यासाठी या प्रकल्पाने वाघांचे अधिवास पुनर्संचयित केले होते.

हे कला प्रदर्शन आदिवासी समुदाय आणि भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या आसपास राहणारे इतर वनवासी यांच्यातील अनोखे नाते तसेच जंगल आणि वन्यजीव यांच्याशी असलेले त्यांचे खोलवरचे नाते हे सर्व या कलाकारांच्या कलाकृतींद्वारे व्यक्त केले जाईल. प्रदर्शित केलेली कलाकृती चित्रांच्या स्वरूपात असून गोंड, भिल्ल आणि यासारख्या इतर अनेक आदिवासी समुदायांचे जुने परस्पर बंध प्रतिबिंबित करेल. ही चित्रे खरेदीसाठी उपलब्ध असतील. त्यातून मिळणारे पैसे थेट कलाकारांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972828) Visitor Counter : 127


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu