संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारितोषिक वितरण समारंभ - सरदार के.एम.पणिक्कर ‘एनआयबी’ निबंध स्पर्धा

प्रविष्टि तिथि: 28 OCT 2023 10:55AM by PIB Mumbai

नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी त्यांच्या दालनात एका छोटेखानी पारितोषिक वितरण समारंभात, कमांडर (Cdr) एम. अरुण चक्रवर्ती यांना पहिले एनआयबी ('NIB') (नौदलाचे बौद्धिक गुणवत्तेसाठीचा पुरस्कार ) प्रदान केले. कमांडर एम. अरुण चक्रवर्ती हे भारतीय नौदलाच्या सरदार केएम पणिक्कर एनआयबी निबंध स्पर्धेचे विजेते आहेत, जी नौदल समुदायामध्ये वाचन, लेखन आणि विचार कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. कार्मिक विभागाचे प्रमुख वाइस एडमिरल (व्हीएडीएम) के.स्वामीनाथन, आणि कमोडोर (नौदल शिक्षण) सीएमडीइ जी. रामबाबू हेही यावेळी उपस्थित होते.

सागरी धोरण विषयक विचारवंत सरदार केएम पणिक्कर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, ज्यांनी सागराचे महत्व आणि सागरी किनारी प्रदेशाच्या महत्त्वाच्या बाबींविषयी भारताला सागरी प्रबोधन/जागरूकता नव्याने मिळवून दिली होती.

(https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1934512

***

SushamaK/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1972400) आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu