वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय आंब्यांच्या निर्यात व्याप्तीत वाढ
एप्रिल ते ऑगस्ट 2023-24 या वित्तीय वर्षाच्या पाच महिन्यांत भारताने 47. 98दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या आंब्यांची केली निर्यात
गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात भारताने आंबा निर्यातीत नोंदवली 19% वाढ
Posted On:
27 OCT 2023 10:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
भारताच्या कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा , तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आंबा निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली असून निर्यात केलेल्या आंब्यांचे मूल्य 47. 98दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. गेल्या वर्षीच्या 40 . 33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत या वर्षात भारताने आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा , यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात 48 . 53 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 22963.78 मेट्रिक टन आंबे निर्यात केले होते. तर चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 47. 98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 27330.02 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत. 2023 मधील हंगामात आंब्यांची निर्यात वाढवण्याच्या हेतूने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व अपेडा (APEDA ) ने अमेरिकेच्या कृषी विभागाच्या पशु व वनस्पती आरोग्य परीक्षण सेवेच्या (APHIS)निरीक्षकांना वाशी, नाशिक, बंगळुरू व अहमदाबाद येथील इरेडिएशन केंद्रात आमंत्रित केले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात भारताने अमेरिकेला केलेल्या आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच 2043.60 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत.
केंद्र सरकारच्या संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने अमेरिकेसह जपानला 43.08 मेट्रिक टन, न्यूझीलंड ला 110.99 मेट्रिक टन , ऑस्ट्रेलिया ला 58.42 मेट्रिक टन आणि दक्षिण आफ्रिकेला 4.44 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली आहे.
चालू आर्थिक वर्षात आंब्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 सालच्या हंगामात भारताने 41देशांना आंबे निर्यात केले असून त्यात इराण, मॉरिशस , आणि नायजेरिया सारख्या नव्या बाजारपेठांचा समावेश आहे.
N.Chitale/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972287)
Visitor Counter : 111