राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 23 OCT 2023 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “मी दसऱ्याच्या शुभ प्रसंगी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना   हार्दिक शुभेच्छा देते आणि शुभकामना व्यक्त करते

"विजयादशमी म्हणून ओळखला जाणारा  दसरा हा सण वाईटावर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक आहे.  पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्ये दसरा हा सण महिषासुर राक्षसावर  देवी दुर्गेचा  विजय म्हणून साजरा करतात तर उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील राज्ये हा सण भगवान रामाचा रावणावरील विजयाचा आनंद म्हणून साजरा करतात."

"हा सण आपल्याला ‘वाईटा'चे प्रतीक असलेल्या अहंकार आणि नकारात्मकतेपासून दूर राहण्याची आणि ‘चांगुलपणा ’चे प्रतीक असलेल्या  एकता आणि प्रेम भावनेने जगण्याची शिकवण देतो. भगवान रामाची मूल्ये आपल्याला जीवनातील कठीण परीक्षा आणि संकटांवर मात करत  धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात."

"या दिवशी आपण देशाच्या समृद्धीसाठी आणि सर्वांच्या, विशेषत: वंचितांच्या कल्याणासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करूया"

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1970294)
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi