वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून (डीपीआयआयटी) 'तांब्याच्या उत्पादनांसाठी' गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित
Posted On:
23 OCT 2023 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) आणि हितसंबंधीतांशी सल्लामसलत केल्यानंतर गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित करण्यासाठी प्रमुख उत्पादने निश्चित केली आहेत. यामुळे 318 उत्पादन मानकांचा समावेश असलेले 60 हून अधिक नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश अधिसूचित करण्यास सुरुवात झाली आहे. यात तांब्याच्या उत्पादनांच्या 9 मानकांचा समावेश आहे.
टिकाऊपणा , यंत्रणक्षमता, गंज प्रतिरोधकता आणि उच्च अचूकतेसह साचेबद्ध क्षमता असलेल्या मऊ आणि लवचिक अशा तांब्याच्या धातूचा वापर विद्युत वाहक इलेक्ट्रिकल वायर आणि केबल्स अशा उत्पादनांमध्ये तसेच प्लंबिंग, टिकाऊपणासाठी औद्योगिक यंत्रसामग्री आणि बांधकाम साहित्यामध्ये केला जातो. तांबे आणि त्याच्या मिश्रधातूंचा वापर वीजनिर्मिती, विद्युत पारेषण, दूरसंचार , इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि अनेक उपकरणांमध्ये केला जातो. त्यामुळे, तांब्याची उत्पादने उत्तम दर्जाची असणे आवश्यक आहे आणि त्याच्या शुद्धतेशी कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाऊ नये.
डीपीआयआयटीने 20 ऑक्टोबर 2023 रोजी 'तांब्याच्या उत्पादनां ' साठी गुणवत्ता नियंत्रण (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2023 अधिसूचित केला आहे, त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
S. No.
|
Indian Standard (IS)
|
Title of Indian Standard
|
1
|
12444:2020
|
Copper Wire Rods for Electrical Applications
|
2
|
613:2000
|
Copper Rods and Bars for electrical purposes
|
3
|
1897:2008
|
Copper Strip for electrical purposes
|
4
|
4171:1983
|
Copper rods and bars for general purposes
|
5
|
1545:1994
|
Solid Drawn copper & copper tubes for condensers and heat exchangers
|
6
|
2501:1995
|
Solid drawn copper tubes for general engineering purposes
|
7
|
14810:2000
|
Copper Tubes for plumbing- specification
|
8
|
10773:1995
|
Wrought Copper Tubes for Refrigeration and Air-Conditioning Purposes
|
9
|
4412:1981
|
Copper Wires for general engineering purposes
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीच्या महत्त्वावर भर देताना सांगितले आहे की, “आपल्या लोकांच्या क्षमतेमुळे आणि देशाच्या विश्वासार्हतेमुळे, उच्च दर्जाची भारतीय उत्पादने व्यापक प्रमाणात जगभरात पोहोचतील. ही आत्मनिर्भर भारत - जागतिक समृद्धीसाठी एक सामर्थ्य या नीतिमूल्यांना ही खरी मानवंदना ठरेल.”
त्याच अनुषंगाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग हा बीआयएस, उद्योग आणि इतर हितसंबंधीतांच्या सहकार्याने आपल्या कायक्षेत्राअंतर्गत औद्योगिक क्षेत्रांसाठी देशात गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था स्थापित करण्यासाठी मिशन मोडवर कार्यरत आहे. गुणवत्ता नियंत्रण आदेश देशातील उत्पादन गुणवत्ता मानकांमध्येच सुधारणा करतील असे नाही तर ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच स्वदेशी उत्पादनांचा ब्रँड आणि मूल्य देखील वाढवतील.
या उत्पादनांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेशांची अंमलबजावणी केवळ ग्राहकांच्या सुरक्षेसाठीच नाही तर हे देशातील उत्पादन गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा करेल आणि भारतातील उप-मानक उत्पादनांची आयात कमी करेल. विकास गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा, उत्पादन माहिती पुस्तिका इ. हे उपक्रम, भारतातील गुणवत्तापूर्ण व्यवस्था विकसित करण्यात मदत करतील.या उपक्रमांद्वारे, भारतामध्ये चांगल्या दर्जाची जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे, यामुळे पंतप्रधानांचे "आत्मनिर्भर भारत" निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
तांबे उत्पादने (गुणवत्ता नियंत्रण) आदेश , 2023 येथे क्लिक करून पाहता येईल.
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1970054)
Visitor Counter : 114