शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागात विशेष मोहीम 3.0 उत्साहात सुरू

Posted On: 21 OCT 2023 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

शिक्षण मंत्रालयाने दृढ निर्धार आणि उत्साहासह विशेष मोहीम 3.0 हाती घेतली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि त्याच्या स्वायत्त संस्था देशभरातील संस्था आणि शाळांच्या मदतीने सुमारे 8 लाख शालेय विद्यार्थी आणि 43,000 पेक्षा जास्त शिक्षकांच्या सहभागाद्वारे मोहिमेला अधिक बळ देत आहेत.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 31.10.2023 पर्यंत 30,934 स्वच्छता मोहिमा राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमांदरम्यान सार्वजनिक तक्रारी, सार्वजनिक तक्रार अपीलांचा निपटारा तसेच त्यासाठी 38,998 फायलींचा आढावा घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने तिसऱ्या आठवड्यात (20 ऑक्टोबर 2023 रोजी) खालील महत्वपूर्ण टप्पे गाठले आहेत:

मोहिमेदरम्यान 25,715 स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत;

  • 747 सार्वजनिक तक्रारींचे निवारण
  • सार्वजनिक तक्रार अपील 100% निकाली
  • 3,69,032 चौरस फूट जागा मोकळी करून अन्य पर्यायी उत्पादक वापरासाठी ठेवण्यात आली आहे; आणि
  • 26,312 फायलींचा आढावा घेण्यात आला आहे. 13,954 फायली नष्ट करण्यासाठी निवडल्या असून त्यापैकी 11,431 फायली नष्ट करण्यात आल्या आहेत.

10 ऑक्टोबर 2023 रोजी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाचे नोडल अधिकारी आणि त्यांच्या स्वायत्त संस्थांसोबत आढावा बैठक झाली. यात लक्ष्य साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर आणि विशेष मोहीम 3.0 दरम्यान शाळा आणि संस्थांच्या सर्वोत्तम पद्धती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्यावर भर देण्यात आला. बैठकीत, मोहिमेदरम्यान विद्यमान इको क्लबच्या पुनरुज्जीवनासह सर्व केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये आणि सीबीएसई शाळांमध्ये इको क्लब सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे क्लब मिशन लाईफ आणि कंपोस्टिंगशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होतील आणि अनुकरणीय पद्धती म्हणून सेवा बजावतील.

विशेष मोहीम 3.0 दरम्यान, संस्था आणि शाळांचा सक्रिय सहभाग जगासमोर एक प्रेरणादायी उदाहरण सादर करत आहे. सीमेपलीकडील विद्यार्थी, उदाहरणार्थ, दोहा, कतार येथील शांती निकेतन इंडियन स्कूलमधील विद्यार्थीही सक्रियपणे स्वच्छतेचा संदेश पुढे नेत आहेत. दरम्यान, केंद्रीय विद्यालय, सीएलआरआय, चेन्नई यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यांना ठिबक सिंचन उपकरणांमध्ये रूपांतरित करण्याची एक उत्तम पर्यावरण-स्नेही कल्पना मांडली आहे.  याव्यतिरिक्त, पर्यावरणीय शाश्वततेप्रति बांधिलकी दर्शवत कंपोस्ट खड्डे तयार करण्यात देखील शाळा पुढाकार घेत आहेत.

 

* * *

M.Pange/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969834) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil