शिक्षण मंत्रालय

कार्यक्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची विशेष मोहीम 3.0

Posted On: 21 OCT 2023 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय सध्या विशेष मोहीम 3.0 या त्यांच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या तिसऱ्या आठवड्यात कार्यरत आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये राष्ट्रीय संस्था, संघटना, अधीनस्थ संस्था आणि एमएसडीई संकुलांमध्ये कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

विशेष मोहीम 3.0 हे जागेचे प्रभावी व्यवस्थापन आणि कामाच्या ठिकाणी वातावरण सुधारण्यावर केंद्रित आहे. ही मोहीम स्वच्छता आणि परिचालनाच्या बाबतीत उत्कृष्टतेचे मापदंड कायम राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करते.

प्रारंभिक टप्प्यात, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी आणि मोहिमेच्या कालमर्यादेत प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली. मंत्रालयाच्या नोंदीनुसार 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करणे, भौतिक फायलींचा आढावा घेणे, स्वच्छता मोहिमेचे आयोजन करणे आणि अधिकची जागा पुन्हा मिळवणे यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आपल्या सहाय्यक संस्थांसह विशेष मोहीम 3.0 च्या अखेरपर्यंत सर्व प्रलंबित बाबींचे निराकरण करण्याच्या वचनबद्धतेप्रति दृढ असून, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासाठी समर्पण अधोरेखित करते. सचिव अतुल कुमार तिवारी यांनी 6 ऑक्टोबर 2023 आणि 16 ऑक्टोबर 2023 रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत, उपक्रमाच्या प्रगतीचा वैयक्तिकरित्या आढावा घेतला. हे अधिकारी मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत करत असून मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करण्यासाठी दैनंदिन प्रगतीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी एका दक्ष टीमवर सोपवली आहे.

 

* * *

M.Pange/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969811) Visitor Counter : 79


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu