ऊर्जा मंत्रालय
विशेष मोहीम 3.0 चा उर्जा मंत्रालयात उत्साह
Posted On:
21 OCT 2023 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
उर्जा मंत्रालय आणि या मंत्रालयाशी संलग्न तसेच अखत्यारीतील कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आणि देशाच्या विविध भागात त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करणाऱ्या इतर संस्था, विशेष मोहीम 3.0 मध्ये उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. स्वच्छता सुधारण्यासाठी आणि प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी सरकारने ही मोहीम हाती घेतली आहे. या संकल्पनेवर 2021 आणि 2022 मध्ये विशेष मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. सेवा वितरणासाठी जबाबदार असलेली क्षेत्रे तसेच बाह्य कार्यालयांवर किंवा सार्वजनिक कार्यालयांवर विशेष मोहीम 3.0 ने लक्ष केंद्रित केले आहे.
2 ऑक्टोबर 2023 रोजी या मोहीमची सुरुवात झाली असून 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ती चालेल. या मोहिमेदरम्यान ऊर्जा मंत्रालय स्वच्छतेवर, कार्यालयातील कामाच्या ठिकाणी जागा मोकळी करण्यावर आणि लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ऊर्जा मंत्रालयाने आजघडीला भंगाराच्या विल्हेवाटीतून 9.73 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. 67,400 चौरस फुटांहून अधिक कार्यालयीन जागा मोकळी करण्यात आली आहे आणि 4,600 फायली निकाली काढल्या केल्या आहेत. 29 प्रशासन प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या आहेत आणि 245 स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. साध्य केलेले टप्पे खाली दिले आहेत.
भंगाराच्या विल्हेवाटीने कमावलेला महसूल : रु. 9,73,32,005/-
मोकळी झालेली जागा : 67,404 चौ. फुट
भौतिक नस्तींचे पुनरावलोकन : 13,986
निकाली काढलेल्या भौतिक फायली : 4,600
एन ए आय कडे हस्तांतरित केलेल्या भौतिक फायली : 369
सार्वजनिक तक्रारींचे निवारण : 146
29 नियम / प्रक्रिया सुलभीकरण : 29
स्वच्छता अभियान आयोजित केलेल्या ठिकाणांची संख्या : 245
* * *
M.Pange/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969790)
Visitor Counter : 99