आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी मंत्रालयात, स्वच्छता अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत, स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या कामांना वेग
इतर स्वच्छता मोहिमांसोबतच, 1070 प्रत्यक्ष फाईल्सचा आढावा आणि 352 फाईल्सचा निपटारा; 723 ई फाईल्सचा आढावा घेण्याचे निश्चित तसेच 103 ई-फाईल्स बंद
Posted On:
21 OCT 2023 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयात विशेष स्वच्छता मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. या मोहिमेचा मुख्य भर सार्वजनिक तक्रारींचा निपटारा करणे, संसद सदस्यांकडून आलेल्या तक्रारी, स्वच्छता मोहीम, प्रलंबित फायली निकाली काढणे टाकणे इत्यादी बाबींवर आहे. स्वच्छता मोहिमे अंतर्गत, विविध उपक्रमांची उद्दिष्टे निश्चित करण्यासाठीचा पूर्वतयारी टप्पा 15 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाला. तर, मुख्य मोहीम 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली असून ती 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे.
आतापर्यंत कार्यालयाच्या बाहेर दोन मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. 1070 प्रत्यक्ष फायलींचा आढावा घेण्यात आला आहे तर 352 फायली काढून टाकण्यात आल्या आहेत, 723 ई-फायली आढाव्यासाठी निवडण्यात आल्या आहेत आणि 103 ई-फायली बंद करण्यात आल्या आहेत. खासदारांकडून आलेले 7 संदर्भ, संसदेशी संबंधित 3 विषय, राज्य सरकारच्या संदर्भाने आलेले 2 विषय, 121 सार्वजनिक तक्रारी, पंतप्रधान कार्यालयाकडून आलेला 1 विषय तसेच सार्वजनिक तक्रारींची 19 अपीले निकाली काढली गेली आहेत. तसेच, इतर उपक्रमांद्वारे 100 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा मोकळी करण्यात आली आहे.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाने मोहिमेच्या कालावधीत निश्चित केलेली जवळपास सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोहिमेच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे तसेच प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने आयोजित केलेल्या एससीपीडीएम पोर्टलवर अद्ययावत माहिती अपलोड केली जात आहे. स्वच्छता मोहीम हाती घेण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे कमी करण्याच्या कामी सर्व स्वायत्त संस्था/अधीनस्थ कार्यालये उत्साहाने सहभागी होत आहेत.
मंत्रालयातील अधिकारी आणि इतर संबंधित लोकही कार्यालय आणि त्याच्या आवारात स्वच्छ परिसर उपलब्ध करून देण्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले आहेत. स्वच्छता मोहिमेविषयी, जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया मंचांवर स्वच्छता मोहिमा ठळकपणे दाखवल्या जात आहेत. आदिवासी व्यवहार मंत्रालय ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असून, ह्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
* * *
M.Pange/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969690)
Visitor Counter : 113