दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
'ट्राय' ने दूरसंचार मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा ) नियमन 2023 मसुद्यावर टिपण्णी पाठवण्यासाठीची अंतिम मुदत वाढवली
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2023 3:36PM by PIB Mumbai
'ट्राय' अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 27.09.2023 रोजी दूरसंचार मोबाइल क्रमांक पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा) नियमन, 2023 मसुदा जारी केला. या मसुदा नियमनांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 25.10.2023 ही निश्चित करण्यात आली होती. मात्र टिप्पण्या सादर करण्यासाठी मुदत वाढवण्याची उद्योग संघटनेची विनंती लक्षात घेऊन, लेखी टिप्पण्या सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 08.11.2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टिप्पण्या, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याकडे शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advmn@trai.gov.in. वर पाठवाव्यात. कोणतेही स्पष्टीकरण/माहिती, यासाठी अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधता येऊ शकेल.
***
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969412)
आगंतुक पटल : 139