विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

28-29 ऑक्टोबर 2023 (शनिवार-रविवार) रोजी आंशिक चंद्रग्रहण

Posted On: 20 OCT 2023 12:32PM by PIB Mumbai

 

28-29 ऑक्टोबर 2023 (6-7 कार्तिक, 1945 शके) रोजी आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चंद्र उपछायेत प्रवेश करणार असला तरी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्रत्यक्ष ग्रहणाचा (छत्री) टप्पा सुरू होईल. मध्यरात्रीच्या सुमारास भारतातील सर्व ठिकाणाहून हे ग्रहण दिसणार आहे.

पश्चिम पॅसिफिक महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, पूर्व दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य भाग, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागर या भागात हे ग्रहण दिसणार आहे.

या अंशिक ग्रहणाच्या छत्री आकाराच्या टप्प्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होईल आणि ते मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटा पर्यंत दिसू शकेल.

या ग्रहणाचा कालावधी 1 तास 19 मिनिटे एवढा असणार असून त्याचा आकार 0.126 एवढा अगदी लहान असणार आहे.

यापुढचे चंद्रग्रहण जे भारतातून 07 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे आणि तेच पूर्ण चंद्रग्रहण असेल.

भारतातून 8 नोव्हेंबर 2022 रोजी दिसलेले शेवटचे चंद्रग्रहण होते आणि ते पूर्ण ग्रहण होते.

चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि जेव्हा हे तिन्ही घटक सरळ रेषेत येतात. पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेखाली येतो आणि आंशिक चंद्रग्रहण तेव्हाच होते जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या छायेत येतो.

***

G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969368) Visitor Counter : 147