युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आगामी आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांसाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची 303 खेळाडू आणि 143 प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना मंजुरी
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2023 6:16PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आगामी आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांसाठी 17 क्रीडा प्रकारातील एकूण 303 खेळाडूंच्या सहभागाला मंजुरी दिली आहे. मंत्रालयाने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांच्या पथकाचा भाग म्हणून आणि एकूण 143 प्रशिक्षक, सोबती, अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी यांना देखील मंजुरी दिली आहे. या खेळाडूंमध्ये 191 पुरुष आणि 112 महिला खेळाडूंचा समावेश असून ऍथलेटिक्स प्रकारासाठी सर्वाधिक 123 खेळाडूंच्या सर्वात मोठ्या चमूचा यात समावेश आहे. 2018 मध्ये झालेल्या आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये 13 क्रीडा प्रकारात एकूण 190 खेळाडू सहभागी झाले होते आणि या स्पर्धांमध्ये त्यांनी 15 सुवर्णपदकांसह एकूण 72 पदकांची कमाई केली होती. आगामी आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 करिता खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे.
संपूर्ण यादीसाठी कृपया येथे क्लिक करा.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1968562)
आगंतुक पटल : 137