संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खडकवासला स्थित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून प्रबोधिनीच्या आवारात प्रथमच आयोजित मॅरेथॉनमध्ये 13,500 हून अधिक स्पर्धक सहभागी

Posted On: 16 OCT 2023 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

खडकवासला स्थित  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या वर्षभर सुरु असलेल्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून,प्रबोधिनीच्या आवारात 15 ऑक्टोबर 2023 रोजी पहिल्यांदाच मॅरेथॉनचे आयोजन केले होते. तरुणांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित एनडीए मॅरेथॉन ने देशभरातून सहभागी 13,500 हून अधिक स्पर्धकांना केवळ धैर्य आणि सहनशक्तीचा धडाच दिला नाही तर त्यांना, विशेषतः तरुणांना, प्रबोधिनीच्या उच्च-स्तरीय प्रशिक्षण सुविधा आणि वारशाची माहिती दिली.

मॅरेथॉनमध्ये एकाच वेळी 42-किमी पूर्ण मॅरेथॉन, 21-किमी अर्ध-मॅरेथॉन आणि 10-किमी, 5-किमी आणि 3-किमी दौड यासह अनेक शर्यतीं घेण्यात आलया. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) खडकवासला, पुणे, महाराष्ट्र येथे आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा परिसर  7,015 एकरमध्ये पसरलेला आहे आणि नयनरम्य टेकड्या आणि मोठ्या तलावाने वेढलेला आहे. एनडीए परिसरातील धावण्याचा ट्रॅक हा 21 किमीचा चक्राकार मार्ग आहे जो  धावपटूंना परिसराच्या  निसर्गरम्य सौंदर्याचे दर्शन घडवतो.

मॅरेथॉनमधील सर्वात वयस्क  सहभागी 96 वर्षांचे होते आणि सर्वात लहान पाच वर्षांचे होते. विविध श्रेणीतील विजेते खालील प्रमाणे आहेत:

अंतर

शर्यत श्रेणी

वयोगट

प्रथम

द्वितीय

तृतीय

42-किमी

पुरुष

18 - 35 वर्षे

निशु कुमार

श्रीकांत महतो

गणेश खोमने

36 - 45 वर्षे

कृष्णा सिरोठिया

लेफ्टनंट कर्नल स्वरूपसिंह कुंतल

वसंत पंडित

महिला

18 - 35 वर्षे

लेफ्टनंट कमांडर अंजनी पांडे

रजनी सिंह

रविता

रामविलास राजभर

36 - 45 वर्षे

अश्विनी

गोकुळ देवरे

आरती

चंदन

अग्रवाल

नेहा लोढा

21-किमी

पुरुष

18 - 35 वर्षे

परासरन

हलीहोल

कॅडेट एरोन

बेट

कॅडेट अहमद

अली

36 - 45 वर्षे

संजय नेगी

अंकुश

गुप्ता

योगेश सानप

महिला

18 - 35 वर्षे

वेदांशी जोशी

भवनीत कौर

प्रियांका दशरथ

पाईकराव

36 - 45 वर्षे

अनुभूती

चतुर्वेदी

नेत्रा

अंजु चौधरी

10-किमी

पुरुष

14 - 18 वर्षे

मोहित

यादव

वैभव संजय

येडगे

अविनाश लोंढे

19 - 35 वर्षे

अनुराग

कोनकर

आनंदु अशोक

एएस

कोमींधल

पुरुषोत्तम

36 - 45 वर्षे

नरेंद्र पटेल

सचिन निकम

अजित निकम

महिला

14 - 18

वर्षे

परिधी

बुधवार

सिद्धी

महादेव गुरव

ह्रिया नीरव शहा

19 - 35 वर्षे

कॅडेट रितुल

कॅडेट इशिता

सांगवान

जयश्री वनमा

36 - 45 वर्षे

तृप्ती गुप्ता

हसीना थेमाली

अदिती मोहिले

एनडीए  16 जानेवारी 2024 रोजी आपल्या स्थापनेची  75 गौरवशाली वर्षे पूर्ण करेल.16 जानेवारी 2023 रोजी सुरू झालेल्या वर्षभराच्या अमृत  महोत्सवाचा भाग म्हणून, विविध शैक्षणिक, क्रीडा आणि साहसी उपक्रमांचे नियोजन आणि आयोजन करण्यात आले आहे.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968128) Visitor Counter : 94


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu