मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
"केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला 17 ऑक्टोबर 2023 रोजी महाबलीपुरम येथे, हिंद - प्रशांत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मत्स्यपालन प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन बळकटीकरण उपायांना हवामान बदलाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील.
Posted On:
15 OCT 2023 6:00PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते 17 ऑक्टोबर 2023 रोजी चेन्नईतील महाबलीपुरम येथील केन्सेस पाम बीच येथील आयटीसीच्या वेलकॉम हॉटेलमध्ये "हिंद - प्रशांत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मत्स्यपालन प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन बळकटीकरण उपायांना हवामान बदलाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाबद्दल विशेष माहिती:
केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते होणार आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; सागरी मत्स्यव्यवसायातील हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या भारताच्या तयारीवर विचारमंथन सत्र आणि या विषयासंबंधीचे प्रदर्शन ज्यामध्ये संशोधन आणि शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत.
सामुदायिक संस्था आणि नवोन्मेषक या परिषदेच्या संकल्पनेशी संबंधित त्यांच्या नवकल्पना आणि उपक्रम प्रदर्शित करतील.
डॉ. एल. मुरुगन यांचे विशेष भाषण होणार आहे.
खाद्य आणि कृषी संस्थांमधील (FAO) वरिष्ठ अधिकारी; प्रादेशिक मत्स्यपालन संस्थांचे (RFBs) प्रतिनिधी; मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय संशोधन संस्था; पृथ्वी विज्ञान मंत्रालय; पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि भारतीय कृषी संशोधन परिषद; तटीय राज्य सरकारे तसेच तामिळनाडूतील डॉ. जे. जयललिता मत्स्यपालन विद्यापीठ, कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, सत्यभामा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था यासारखी विद्यापीठे आणि विविध उद्योग आणि मच्छीमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967946)
Visitor Counter : 123