उपराष्ट्रपती कार्यालय

9व्या जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेच्या (पी20) निमित्ताने उपराष्ट्रपतींनी सभापती आणि शिष्टमंडळाच्या प्रमुखांसाठी स्नेहभोजनाचे केले आयोजन

Posted On: 14 OCT 2023 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2023

 

नवी दिल्लीतील यशोभूमी येथे 9व्या जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेच्या (पी 20)निमित्ताने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड  यांनी आज सहभागी राष्ट्रांच्या प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

12 ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत भारतीय संसदेने आंतर-संसदीय संघच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 9व्या पी20 शिखर परिषद आणि संसदीय मंचात भाग घेतलेल्या जी20 राष्ट्रांचे सभापती आणि शिष्टमंडळाचे प्रमुख या स्नेहभोजनाला उपस्थित होते.

  

नवी दिल्ली मध्ये आयोजित या स्नेहभोजनात उपराष्ट्रपतींनी त्यांच्याशी संवाद साधला. आंतर-संसदीय संघाचे अध्यक्ष  महामहीम डुआर्टे पाचेको यांचीही यशोभूमी येथे भेट घेतली. आंतरसंसदीय सहकार्याचे महत्त्व आणि संसदेच्या सदस्यांना समकालीन काळाशी संबंधित विस्तृत मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आंतर-संसदीय संघाची भूमिका यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

   

  

उपराष्ट्रपतींनी संसदीय मंच आणि पी20 शिखर परिषदेच्या निमित्ताने जी-20 देशांच्या संसदीय शिष्टमंडळांशीही संवाद साधला.

 

 

 

 

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967756) Visitor Counter : 94


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil