संरक्षण मंत्रालय
लष्करी कमांडर्स परिषदेला 16 ऑक्टोबर 2023 पासून होणार प्रारंभ
Posted On:
14 OCT 2023 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2023
लष्करी कमांडर्स परिषदेला 16 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे प्रारंभ होणार आहे. सर्वोच्च स्तरावरील ही परिषद वर्षातून दोनदा होते. भारतीय लष्करासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सुलभ करणे, वैचारिक पातळीवर विचारविनिमय करणे यासाठी हे एक संस्थात्मक व्यासपीठ आहे.
या वर्षी स्वीकारलेल्या नवीन प्रारुपानुसार, आगामी लष्करी कमांडर्स परिषद मिश्र स्वरूपात आयोजित केली जात आहे. पहिल्या दिवशी लष्करी कमांडर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. उर्वरित चर्चा प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जाईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 18 ऑक्टोबर 2023 रोजी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख, जनरल मनोज पांडे, हवाईदल प्रमुख व्ही आर चौधरी उपस्थितांना संबोधित करतील. केन्द्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद हे देखील “राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
भारतीय सैन्याच्या कार्य सज्जतेचा आढावा घेण्यासोबतच सध्याच्या/उदयोन्मुख सुरक्षा परिस्थितींवर सर्वोच्च नेतृत्व विचारमंथन करेल. सध्या सुरू असलेल्या परिवर्तन प्रक्रियेचा आढावा, प्रशिक्षणाच्या बाबी, मनुष्यबळ व्यवस्थापनाचे पैलू आणि सेवारत तसेच माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसह महत्त्वाच्या विषयांवर देखील ते चर्चा करतील. भारतीय सैन्य प्रगतीशील, दूरदृष्टीभिमुख, अनुकूल आणि भविष्यासाठी सज्ज असेल याची खातरजमा लष्करी कमांडर्स परिषद, त्याच्या विस्तृत व्याप्तीसह करते.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1967677)
Visitor Counter : 182