कृषी मंत्रालय

डीएआरपीजीने सप्टेंबर 2023 साठी जारी केलेल्या सीपीजीआरएएमएस वरील 17 व्या अहवालातील कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची कामगिरी

Posted On: 13 OCT 2023 11:48AM by PIB Mumbai

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) सप्टेंबर, 2023 साठी केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (सीपीजीआरएएमएस) वरील 17 वा मासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात सार्वजनिक तक्रारींचे प्रकार, श्रेणी आणि निकालाचे स्वरूप यांचे तपशीलवार विश्लेषण केले आहे. 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची कामगिरी:

 कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडे सप्टेंबर 2023 मध्ये सर्वाधिक 11198 सार्वजनिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने सप्टेंबर, 2023 मधे तक्रार निवारण मूल्यांकन आणि अ गटातील (500 हून अधिक तक्रारी) निर्देशांकात अव्वल कामगिरी केली आहे.

सामान्य सेवा केन्द्राशी (सीएससी) सीपीजीआरएएमएसला जोडण्यात आले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाला सप्टेंबर 2023 मध्ये सर्वाधिक 5167 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाला सप्टेंबर 2023 मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी 46.14% तक्रारी सीएससी मार्फत दाखल करण्यात आल्या आहेत. म्हणजेच 11198 पैकी 5167 तक्रारी सीएससी मार्फत नोंदवण्यात आल्या आहेत.

सप्टेंबर 2023 मध्ये 387 तक्रारी पुढे आल्या. तर 11198 नवीन तक्रारी प्राप्त झाल्या आणि एकूण 11585 तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी 8830 निकाली काढण्यात आल्या. 30 सप्टेंबर 2023 रोजी 2755 तक्रारी प्रलंबित होत्या.

जानेवारी ते सप्टेंबर 2023 पर्यंत  5145 तक्रारी पुढे आल्या होत्या. 31 डिसेंबर, 2022 पर्यंत 95687 नवीन तक्रारी प्राप्त झाल्या असून एकूण 100832 तक्रारी पैकी 98077 निकाली काढण्यात आल्या आहेत. 30 सप्टेंबर 2023 रोजी 2755 तक्रारी प्रलंबित होत्या. या कालावधीत 97% तक्रार निवारणाचा दर गाठला गेला.

****

NM/Vinayak G/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967319) Visitor Counter : 97