राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने, सरकारी संस्था, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे अशा महत्वाच्या क्षेत्रातील सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी, राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास 'भारत एन सी एक्स 2023' चे केले आयोजन
Posted On:
10 OCT 2023 12:10PM by PIB Mumbai
भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांच्या हस्ते आज 'भारत एन सी एक्स, 2023 चे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागार राजेंद्र खन्ना आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक लेफ्टनंट जनरल एम यु नायर यावेळी उपस्थित होते.
दुसरा राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव 2023, भारत एन सी एक्स 2023, पुढचे 12 दिवस, 9 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत, मिश्र म्हणजे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. या परिषदेचे उद्दिष्ट सरकरमधील / महत्वाच्या संस्था आणि सार्वजनिक तसेच खाजगी संस्थां मधील वरिष्ठ व्यवस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी यांना सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे, सध्या असलेले सायबर धोके सांगणे आणि सायबर विषयक घटना घडल्यास काय खबरदारी घ्यायची, प्रतिसाद कसा द्यायचा, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या भागीदारीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
हा पथदर्शी उपक्रम विविध क्षेत्रातील सरकारी यंत्रणा, सार्वजनिक सनास्था आणि खाजगी क्षेत्रे यांच्यातील 300 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना एका मंचावर आणणारा उपक्रम आहे. या प्रशिक्षण सत्रामधून महत्वाची माहिती असलेल्या उपकरणांची सुरक्षा करण्यासाठी सर्वांची काटिबद्धता, थेट फायर आणि धोरणात्मक अभ्यास सत्रे घेतली जाणार आहेत. सहभागी प्रतिनिधींना, महत्वाची सायबर सुरक्षा विषयक क्षेत्रे, जसे की, घुसखोरी शोध तंत्र, मालवेअर माहिती शेअरिंग प्लॅटफॉर्म (MISP), सुरक्षेतील त्रुटी कशा दूर करायच्या आणि एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये सायबर धोका किती आतपर्यंत पोहोचू शकेल, नेटवर्क प्रोटोकॉल आणि डेटा प्रवाह, डिजिटल फॉरेन्सिक्स इत्यादी विषयांची माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाणार आहे.
भारत एनसीएक्स इंडिया, महत्वाच्या पदांवरील नेत्यांना, सायबर धोक्याची नीट जाणीव करून घेण्यात, त्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यास, सायबर संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठीची कौशल्ये विकसित करणे, इत्यादी कामांसाठी मदत करणार आहे. यामुळे, सायबर सुरक्षा कौशल्ये तपासणे, टीमवर्क, नियोजन, संपर्क-संवाद, महत्वाच्या बाबींचा विचार, आणि निर्णय क्षमता, अशा सगळ्यांसाठी देखील मदत मिळणार आहे.
केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, डॉ. अजय कुमार सूद, यांनी आपल्या मुख्य भाषणात सायबर कर्मचार्यांचे कौशल्य वाढवणे, उपस्थितांना सायबर योद्ध्यांची एक शक्तिशाली सेना बनण्यासाठी प्रेरणा देण्याचे सर्वोच्च महत्त्व अधोरेखित केले. आपल्या भाषणात भारताच्या सायबर सुरक्षा संरक्षणाला बळकट करण्यासाठी पायाभूत आधारस्तंभ म्हणून सतत नवनव्या गोष्टी शिकणे आणि कौशल्य जोपासण्यावर भर दिला. "क्वांटम सेफ" होण्याच्या गरजेबद्दल बोलताना त्यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) संरक्षण, हार्डवेअर सुरक्षा गरजा आणि पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी यांचे महत्त्व विशद केले.
राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक, लेफ्टनंट जनरल एम यू नायर यांनी भारताच्या सायबर डोमेनचा धोरणात्मक आढावा सादर केला. देशाच्या डिजिटल मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सामूहिक दक्षतेच्या निर्णायक भूमिकेवर जोर देऊन वाढत्या सायबर धोक्यांविषयी माहिती दिली.
याशिवाय, भारत NCX 2023 अंतर्गत, भारतीय सायबर सुरक्षा स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम आस्थापना (MSMEs) यांच्या नावीन्यपूर्ण आणि टिकाऊ गुणांवर प्रकाश टाकणारे एक विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1966255)
Visitor Counter : 179