आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आभा-आधारित स्कॅन आणि सामायिक सेवेचा वापर करुन अंमलबजावणी झाल्यापासूनच्या एका वर्षात बाह्य रुग्ण विभागातून 1 कोटी टोकन्स देण्यात आली
रुग्णांसाठी असलेल्या या डिजिटल ओपीडी नोंदणी सेवेच्या अंमलबजावणीमध्ये अव्वल कामगिरी करण्यात उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि जम्मू आणि काश्मीर ही राज्ये आघाडीवर
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, (NHA) तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत नागरिकांना आरोग्यसेवा देण्यात सहाय्य करण्यासाठी स्कॅन आणि शेअर सुविधेचा अधिकाधिक वापर करणार
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2023 11:27AM by PIB Mumbai
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आभा-आधारित स्कॅन आणि शेअर सेवेचा वापर करून रूग्णालयांतून होणाऱ्या बाह्य रुग्ण विभागातील नोंदणीसाठी 1 कोटींहून अधिक टोकन देण्याचा मोठा टप्पा पार केला आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) या मोहिमेअंतर्गत ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कागदविरहीत सेवेत आभा प्रोफाइलद्वारे रूग्णांना बाह्य-रुग्ण विभागात (OPD) नोंदणीसाठी काउंटरवर ठेवलेला QR कोड स्कॅन करुन त्वरित नोंदणी करता येत असून रूग्णालयातील सेवा सामायिक करण्यास अनुमती देते. ही सेवा सध्या भारतातील 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 419 जिल्ह्यांमधील 2,600 हून अधिक आरोग्य सुविधांसाठी कार्यरत आहे.
सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी रुग्ण नोंदणी करताना काउंटरपुढे होणाऱ्या रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रुग्णांना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी या स्कॅन आणि शेअर सेवेचा जलद अवलंब केला आहे.
एबीडीएम पब्लिक डॅशबोर्डमधील आकडेवारी (https://dashboard.abdm.gov.in/abdm/ ) दिल्ली, भोपाळ आणि रायपूर या शहरातील उत्कृष्ट एम्स मधून या सेवेचा वापर अधिकाधिक वापर होत असल्याचे दर्शवते. तसेच, यातील पंधरापैकी नऊ रुग्णालये उत्तर प्रदेशात आहेत. बाह्य रुग्ण विभागातील आभा-आधारित स्कॅन आणि शेअर सेवेचा वापर करून तयार केलेल्या टोकनच्या एकूण संख्येत कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर आणि दिल्ली हे प्रदेश यूपीच्या जवळपास आहेत.एम्स-नवी दिल्ली, एसआरएन रुग्णालय- प्रयागराज आणि एम्स, रायपूर ही सरकारी रुग्णालये स्कॅन आणि शेअर सेवेत सर्वोत्तम वापर करणाऱ्या आरोग्य सुविधा म्हणून उदयास आली आहेत.
या डिजिटल सेवांच्या महत्त्वाविषयी बोलताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणाले – “एबीडीएमचे उद्दिष्ट आरोग्य सेवा सुविधा देण्यात सुलभता आणि कार्यक्षमता निर्माण करणे हे आहे. बाह्यरुग्ण विभागाच्या काउंटरवरील स्कॅन आणि शेअर सेवा हा एक साध्या सोप्या तंत्रज्ञानाचा वापर आहे ज्यामुळे जवळपास 1 लाख रूग्णांचा रूग्णालयातील रांगेत उभे रहाण्याचा रोजचा वेळ वाचवण्यास मदत होत आहे. जेव्हा रुग्ण या आरोग्य सेवांमध्ये टोकन घेऊन प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या वेदना कमी करण्याच्या उद्देशाने, आम्ही या सेवा आता औषधांच्या काउंटरवर तसेच प्रयोगशाळांमधून सुध्दा विस्तारीत करण्याची योजना आखत आहोत. वृद्ध रुग्ण, गरोदर स्त्रिया आणि इतर नागरिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आभा-आधारित नोंदणी केलेल्या रुग्णांना त्यांच्या औषधांची यादी डिजिटल प्रिस्क्रिप्शन, आणि निदान अहवाल सुध्दा या डिजिटल प्रवेशाआधारे मिळवून देण्यास मदत करतील.

रुग्णालये आणि डिजिटल सोल्युशन कंपन्या (DSCs) आरोग्य सुविधांना त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करणार्या स्कॅन आणि शेअर सेवेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेअंतर्गत डिजिटल हेल्थ इन्सेंटिव्ह स्कीम (DHIS) अंतर्गत स्कॅन आणि शेअर व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील देते.
डिजिटल हेल्थ इन्सेन्टिव्ह स्कीम (DHIS) विषयी अधिक तपशील येथे उपलब्ध आहेत:
https://abdm.gov.in/DHIS
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1966250)
आगंतुक पटल : 181