नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक हायड्रोजन आणि इंधन सेल दिवस कार्यक्रमाने शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडवण्यात हायड्रोजनची भूमिका केली अधोरेखित


आपल्या उद्योगांना आणि समुदायांना ऊर्जा संक्रमणातील एक प्रमुख घटक म्हणून हायड्रोजनचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करूया: केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांचे आवाहन.

Posted On: 08 OCT 2023 5:02PM by PIB Mumbai

 

दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक हायड्रोजन आणि इंधन सेल दिनाच्या पूर्वसंध्येला, हरित आणि शाश्वत ऊर्जेचा स्रोत म्हणून हायड्रोजन वापराच्या असीम शक्यतांचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने  7 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्योग, शिक्षण आणि सरकारमधील हायड्रोजन तज्ञ एकत्र आले होते.

 

 या प्रसंगी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी संशोधन आणि विकास आराखड्याचे अनावरण केले. 400 कोटी रुपये अर्थसंकल्पाची तरतूद असलेला हा आराखडा संशोधन आणि विकास परिसंस्था विकसित करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा आराखडा हरित हायड्रोजनचे व्यावसायीकरण करण्यात मदत करू शकेल आणि सोबतच भारताच्या महत्त्वाकांक्षी हवामान आणि ऊर्जा उद्दिष्टांमध्ये योगदान देऊ शकेल. हा आराखडा हरित हायड्रोजन उत्पादन, साठवण आणि वाहतुकीची कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि किफायतशीरपणा सुधारण्यासाठी नवीन साहित्य, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा संशोधन आणि विकास कार्यक्रम सुरक्षेला प्राधान्य देईल आणि हायड्रोजन अर्थव्यवस्था विकसित करण्याच्या मार्गातील तांत्रिक अडथळे आणि आव्हाने दूर करेल.

 

 एका व्हिडिओ संदेशात, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह म्हणाले, “हायड्रोजन हा सर्वात पर्यावरणातील मुबलक घटक आहे आणि त्यात आपल्या उर्जेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची, हवामान  बदलाचे दुष्परिणाम  कमी करण्याची आणि स्वच्छ उर्जेने आपल्या अर्थव्यवस्थांना सामर्थ्यवान करण्याची क्षमता आहे. या जागतिक हायड्रोजन दिनानिमित्त, आपण हायड्रोजन पर्यायाचे संशोधन, विकास आणि उपयोजनाबाबतच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपण आपल्या उद्योगांना आणि समुदायांना ऊर्जा संक्रमणातील एक प्रमुख घटक म्हणून हायड्रोजनचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करू या. हायड्रोजन आपल्या वसुंधरेसाठी शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा आधारस्तंभ बनेल हे आपण एकत्रितरित्या सुनिश्चित करु शकतो.

आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे ध्येय हे 2-3 वर्षात परिणाम दाखवू शकणाऱ्या मिशन मोड प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणे हेच आहे, असे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, प्राध्यापक अजय कुमार सूद यांनी आपल्या मुख्य भाषणात संशोधन आणि विकास आराखड्याबाबत बोलताना सांगितले.

या कार्यक्रमात संशोधन आणि विकास आराखड्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली (NSWS) वरील हरित हायड्रोजन पृष्ठाचे अनावरण देखील करण्यात आले. हे पृष्ठ राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत प्रकल्पांशी संबंधित सर्व मंजूरी मिळविण्यासाठी उद्योगांना एकल खिडकी सुविधा प्रदान करेल. या पृष्ठावर येथून जाता  येईल : : The National Single Window System (NSWS) of Government of India

 जागतिक हायड्रोजन आणि इंधन सेल दिवस हा एक जागतिक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश इंधन सेलच्या बहुमुखी तंत्रज्ञानासह हायड्रोजन हा स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोत म्हणून याबाबत जागरूकता आणि समजूत वाढवणे हा आहे. हा दिवस हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता या महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हायड्रोजन आणि इंधन सेलची क्षमता ओळखण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965788) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu