सांस्कृतिक मंत्रालय
ऐतिहासिक संशोधनापासून ते इतिहास घडवण्यापर्यंत
इतिहासाचा भाग असलेल्या संस्मरणीय भेटवस्तूंची विक्री करण्याची योजना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आखत आहे, ज्यामुळे लोकांना त्या इतिहासाचा एक भाग होता येईल
Posted On:
06 OCT 2023 12:38PM by PIB Mumbai
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अशा संस्मरणीय भेटवस्तूंची विक्री करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांना या स्मारकांबरोबर जवळून काम करण्याची संधी उपलब्ध होईल. वारसा स्थळांमध्ये स्वारस्य आणि रुची वाढविण्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी एएसआय संस्मरणीय मानचिन्हांची मदत घेणार आहे.
भारतीय सांस्कृतिक हस्तकला आणि वारशांचे संवर्धन करत त्यात रुची उत्पन्न करण्यासाठी आणि त्याला ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच संबंधित कारागीर आणि त्यांच्या समुदायांचा, विकास आणि त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी आवड आणि ओळख वाढवण्यासाठी एएसआयने
www.eprocure.gov.in आणि www.asinic.in EOI या संकेतस्थळावर स्वारस्याची अभिव्यक्ती करता येईल, असे जाहीर केले आहे. या संकेतस्थळावर सर्व 84 संस्मरणीय वारसास्थळांची संपूर्ण यादी उपलब्ध आहे.
गेल्या दोन वर्षांपासून एएसआय राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांवर उच्च दर्जाच्या संस्मरणीय भेटवस्तूंची विक्री करण्याच्या धोरणावर विचार करत आहे. भेटवस्तूंची विक्री करणारी ही दुकाने अभ्यागतांना एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव प्रदान करेल, जेणेकरून भारतातील लोक त्यांच्या वारशाशी जोडले जाण्यात सहभागी होऊ शकतात. या वस्तूंत वैशिष्ट्यापूर्ण प्रतिकृतींपासून, उदाहरणार्थ वास्तुशिल्पाचे भाग, महत्त्वपूर्ण शिल्पे, एक जिल्हा एक उत्पादन (वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, ODOP) आणि पुरातन वास्तूंच्या कलाकृतींचा समावेश असू शकेल. प्रतिकृती तयार करण्यासाठी थ्रीडी प्रिंटिंगचा वापर, ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट’(ODOP) उत्पादनांचा समावेश, प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील जुन्या खेळांचा पुनर्विकास आणि पॅकेजिंगपर्यंत, या स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व वाढवू शकतील अशा स्मरणचिन्हांचा यात विचार केला गेला आहे.
अभिव्यक्ती स्वारस्य व्यक्त करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे:
www.eprocure.gov.in आणि www.asi.nic.in.
***
S.Bedekar/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965212)
Visitor Counter : 107