कृषी मंत्रालय
'संशोधनापासून परिणामापर्यंत: न्याय्य आणि लवचिक कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने ' या विषयावरील आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे राष्ट्रपती करणार उद्घाटन
प्रमुख वक्त्यांमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर ; भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत; आणि सीजीआयएआरचे अंतरिम कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक प्राध्यापक अँड्र्यू कॅम्पबेल हे प्रमुख वक्ते आपले विचार मांडणार
Posted On:
06 OCT 2023 3:58PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील पुसा येथील एनएएससी संकुल येथे आयोजित 'संशोधनापासून परिणामापर्यंत: न्याय्य आणि लवचिक कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने ' या विषयावरील आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे उद्घाटन 9 ऑक्टोबर, 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रांचे संघ (सीजीआयएआर) लिंगभाव प्रभाव मंच आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने या परिषदेचे आटोजन करण्यात आले आहे . सर्वत्र महिलांना शेती आणि अन्न व्यवस्थेत नेतृत्वाची भूमिका घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी या आघाडीवर परिवर्तनाचे नेतृत्व केले पाहिजे , हे सुनिश्चित करण्यासाठी या दोन संस्था मिळून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाचा लाभ मिळवून देत आहेत . प्रमुख वक्त्यांमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर ; भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत; आणि सीजीआयएआरचे अंतरिम कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक प्राध्यापक अँड्र्यू कॅम्पबेल हे प्रमुख वक्ते आपले विचार मांडणार आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी आज या परिषदेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला स्पष्टपणे मान्यता दिलेल्या नुकत्याच झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत असून या परिषदेची संकल्पना महत्त्वपूर्ण आहे . यामध्ये हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि पोषण यांसंबंधी क्षेत्रामध्ये महिलांसाठी नेतृत्व आणि निर्णय घेण्याची भूमिका ओळखणे आणि प्रोत्साहन देणे याचा समावेश आहे”,असे डॉ. पाठक यांनी सांगितले.
या परिषदेत 140 हून अधिक मौखिक सादरीकरणे, 85 पोस्टर्स, 25 उच्च-स्तरीय पूर्ण सत्रे आणि मुख्य वक्त्यांची तसेच 60 समांतर सत्रे होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शक आणि भारतीय महिला उद्योजक त्यांचे कार्य आणि नवोन्मेषाचे प्रदर्शन घडवतील . परिषद प्रतिनिधी संशोधन संस्था, राष्ट्रीय कृषी संशोधन आणि विस्तार प्रणाली, गैर-सरकारी संस्था, नागरी समाज संस्था, निधी भागीदार, धोरण-निर्धारण संस्था आणि खाजगी क्षेत्राच्या विस्तृत श्रेणीचे प्रतिनिधित्व करतील.
***
S.Bedekar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965211)
Visitor Counter : 132