विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य क्षेत्रात जागतिक निकषांवर पोहोचण्यासाठी खाजगी-सरकारी क्षेत्रातील समन्वय आवश्यक; दोन्ही बाजूंनी स्त्रोतांचा निकोप पुरवठा देशात परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो: डॉ. जितेंद्र सिंह


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या नेतृत्वकाळात, धोरण आखणीत झालेल्या बदलांमुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात परस्पर विश्वासाचे वातावरण  झाले तयार

Posted On: 06 OCT 2023 4:48PM by PIB Mumbai

 

भारतासारख्या देशात, आरोग्यक्षेत्रात आपल्याला जागतिक निकषांची बरोबरी करायची असेल, तर सार्वजनिक- खाजगी क्षेत्रात समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. दोन्ही बाजूंनी संसाधनांचा निकोप पुरवठा झाल्यास, आपल्याला, रुग्णांना परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देता येतील, असेही त्यांनी पुढे सांगितले.

नवी दिल्लीत सीआयआय ने आयोजित केलेल्या 15 व्या जागतिक मेडटेक (वैद्यकीय तंत्रज्ञान) शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते.

आता देशात शंकेखोर वृत्तीला जागा नाही, असे सांगत, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, धोरण आखणीत जे बदल झाले आहेत, त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे ते पुढे म्हणाले.

मात्र, आरोग्य क्षेत्रात, त्यातही विशेषतः मेड टेक आणि बायो टेक म्हणजेच जैव तंत्रज्ञान क्षेत्रात, सार्वजनिक संस्था आणि खाजगी उद्योग यांच्यात अधिक समन्वय निर्माण होण्यास भरपूर वाव आहे.असे ते म्हणाले.

नवी दिल्लीतील जी 20 शिखर परिषद यशस्वी झाल्यानंतर, पंतप्रधानांनी जागतिक मापदंड, जागतिक धोरणे आणि जागतिक दृष्टिकोनाविषयी, सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.असेही जितेंद्र सिंह म्हणाले.

अनुसंधान एनआरएफ, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष यांच्यात सांगड घालेल आणि त्याला मानवी शहाणपणाची तसेच सामाजिक शास्त्रांची जोड देईल. याला अशासकीय स्त्रोतांद्वारे मुख्यतः निधी पुरवठा केला जाईल. संयुक्त राष्ट्रांच्या एनआरएफ च्या तुलनेत अनुसंधान, अनेक दृष्टीने अधिक उत्तम ठरेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

नीती आयोगाचे सदस्य, डॉ. विनोद के. पॉल, यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सुधारित संशोधन आणि विकास क्षमता, वाढत्या देशांतर्गत उत्पादन क्षमता, उद्योग-शैक्षणिक सहयोग आणि जागतिक भागीदारी यांच्याद्वारे निरोगी आणि सक्षम  भारत निर्माण करण्यात यश मिळवले जाऊ शकते.

डीओपी, रसायने आणि खते मंत्रालयाच्या सचिव  एस. अपर्णा, भारताचे औषध नियंत्रक जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी, सीआयआय नॅशनल हेल्थकेअर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ नरेश त्रेहान, आदी मान्यवरांनी यावेळी आपले विचार मांडले.

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965127) Visitor Counter : 96