रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
हिमाचल प्रदेशातील उना आणि कांगडा क्षेत्रासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीआयआरएफअंतर्गत दिली 154.25 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी
Posted On:
06 OCT 2023 4:34PM by PIB Mumbai
देशातील सुलभ वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा बळकट करणे ही मोदी सरकारची प्राथमिकता आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. सीआयआरएफ (सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) अर्थात केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीअंतर्गत हिमाचल प्रदेशातील उना आणि कांगडा क्षेत्रासाठी 154.25 कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशला अलीकडेच नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. या संदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी हिमाचलमधील पायाभूत सुविधांसाठी नवीन मंजुरीबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.
या मंजुरीनुसार स्वां नदीवर 50.60 कोटी रुपये खर्चून दोन पूल आणि बियास नदीवर 103.65 कोटी रुपये खर्चून पोंग धरण बांधण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
***
S.Bedekar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965082)
Visitor Counter : 92