गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते, नवी दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे आयोजित तिसऱ्या दोन दिवसीय ‘दहशतवाद विरोधी परिषदेचे उद्‌घाटन


आपल्याला केवळ दहशतवादच नाही तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या सर्व व्यवस्थेलाही उद्ध्वस्त करण्याची गरज आहे

आपल्याला एक सामाईक प्रशिक्षण मॉडयूल तयार करण्याच्या दिशेने काम करावे लागेल,ज्याद्वारे दहशतवादाविरोधातील लढ्याच्या कार्यपद्धतीत सूसूत्रता आणली जाऊ शकेल

गृहमंत्र्यांच्या हस्ते एनआयए च्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदके प्रदान

Posted On: 05 OCT 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आयोजित केलेल्या दोन दिवसीय दहशतवाद विरोधी परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री निशीथ प्रामाणिक, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक यांच्यासह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक, राज्यांचे पोलीस महासंचालक, केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते, एनआयए च्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदके देखील प्रदान करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांनी गेल्या नऊ वर्षात देशातील सर्व स्वरूपाच्या दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात महत्वाचे यश मिळवले आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. आपल्याला केवळ दहशतवादच नाही तर दहशतवादाला खतपाणी  घालणाऱ्या व्यवस्थेलाही उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.एनआयएच्या देखरेखीखाली देशात दहशतवादविरोधी आदर्श संरचना तयार केली जावी, अशी सूचना गृहमंत्र्यांनी केली. विविध दहशतवादविरोधी यंत्रणांची श्रेणी, संरचना आणि तपासाची पद्धत सर्व राज्यांमध्ये समान असली पाहिजे, जेणेकरून केंद्र आणि राज्य संस्थांमध्ये अधिक चांगला समन्वय साधता येईल. कोणतीही नवी दहशतवादी  संघटना तयार होऊच नये यासाठी सर्व दहशतवादविरोधी यंत्रणांना असा कठोर दृष्टिकोन स्वीकारावा लागेल, असेही ते पुढे म्हणाले. एनआयए, एटीएस आणि एसटीएफ या यंत्रणांचे काम केवळ तपास करणे हे नाही, तर तपासाच्या मर्यादेतून बाहेर पडत, वेगळ्या पद्धतीने दहशतवादावर प्रहार करण्याच्या दिशेने त्यांनी काम करायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात, जागतिक पातळीपासून ते गावापर्यंत आणि देशातल्या विविध राज्यांपासून ते आंतरराष्ट्रीय सहकार्य घेऊन काम करण्याची गरज आहे, असे शाह म्हणाले.

क्रिप्टो, हवाला, दहशतवादाला आर्थिक पाठबळ , संघटित गुन्हेगारी सिंडिकेट, अंमली पदार्थ तस्करी-दहशतवाद यांच्यातील साटेलोटे, यासारख्या सर्व आव्हानांवर केंद्र  सरकारने जी कठोर भूमिका घेतली आहे, ज्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.

सर्व केंद्रीय आणि राज्यस्तरीय दहशतवादविरोधी यंत्रणांसाठी एक समान प्रशिक्षण मॉड्यूल असावे, जेणेकरून दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या कार्यपद्धतीत एकसमानता आणता येईल. यासाठी, एनआयए आणि गुप्तचर संस्थेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

2001 मध्ये दहशतवादी घटनांची संख्या 6000 होती, दहशतवादाला कठोर पायबंद घालण्याच्या  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेमुळे अशा घटनांची संख्या   2022 मध्ये 900 पर्यंत कमी झाली आहे. 94 टक्क्यांहून अधिक दोषसिद्धी दर  साध्य केल्याबद्दल, त्यांनी एनआयएची प्रशंसा केली. त्याचवेळी, या दिशेने आणखी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व राज्यांना दोषसिद्धीचा दर वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले.

अंमली पदार्थांविरोधात लढा: 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारांच्या मदतीने, अंमली पदार्थांच्या विरोधात मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवादाला काहीही सीमा नसतात आणि कोणतेही राज्य एकट्याने दहशतवादाचा सामना करू शकत नाही, असे सांगत, ही अपप्रवृत्ती  मुळापासून उखडून टाकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. या दोन दिवसीय परिषदेच्या प्रत्येक सत्रात 5 कार्यवाही करण्यायोग्य मुद्दे तयार करून  ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्याची सूचना गृहमंत्र्यांनी केली.

2004 ते 2014 या 10 वर्षांच्या तुलनेत 2014 ते 2023 या 9 वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील हिंसक घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू – काश्मीर : विकास आणि शांततेची नवी पहाट

Indicator

From June 2004 to May 2014

From June 2014 to
August 2023

Percent decline

Total Incidents

7217

2197

70 % decline

Total Deaths (Civilian + Security Forces)

2829

891

69 % decline

Civilian Deaths

1769

336

81 % decline

Security Forces' Deaths

1060

555

48 % decline

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964803) Visitor Counter : 128