रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरक्षा प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी स्काय बसचा केला प्रवास
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2023 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली आणि सुरक्षा प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी स्काय बसचा प्रायोगिक प्रवास केला.

यू-स्काय तंत्रज्ञानाने स्काय बस विकसित केली आहे आणि या वाहतूक सेवा भारतात आणण्यासाठी आय- स्काय मोबिलिटीने यू-स्काय सोबत करार केला आहे.
स्काय बस शहरी प्रवाशांना कार्यक्षम वाहतूक प्रदान करताना प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करून शाश्वत, वाहतूक कोंडी मुक्त शहरी वाहतूक प्रदान करेल. शिवाय, या प्रकल्पाची उन्नत रेल्वे केबल प्रणाली जमिनीचा कमीत कमी वापर करत असल्यामुळे देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मौल्यवान भर टाकणारी आहे.

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964377)
आगंतुक पटल : 191