रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणार्या चेक प्रजासत्ताकामधील प्राग येथे आयोजित 27 व्या वर्ल्ड रोड काँग्रेसच्या मंत्रीस्तरीय अधिवेशनाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले संबोधित
स्टॉकहोम जाहीरनाम्यात निश्चित केलेली जागतिक रस्ते सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा गडकरी यांनी केला पुनरुच्चार
Posted On:
02 OCT 2023 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चेक प्रजासत्ताकामधील प्राग येथे 27 व्या जागतिक रोड काँग्रेसमध्ये रस्ते सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मंत्रीस्तरीय अधिवेशनाला संबोधित केले.
सर्व स्तरावरील हितधारकांनी रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारावा असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. वर्तणुकीत सकारात्मक बदल व्हावा आणि नियमांची निर्दोष अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी भारताने जागरूकता निर्माण करण्यावर भर दिल्याचा त्यांनी पुनर्विचार केला.
न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (NCAP) यासारख्या भारताने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांसह ऑटोमोबाईल सुरक्षेच्या क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली, त्याचबरोबर स्टॉकहोम घोषणेमध्ये निश्चित करण्यात केलेले जागतिक रस्ते सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963446)
Visitor Counter : 120