कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे नेहरू पार्क, नीती मार्ग, नवी दिल्ली येथे "श्रमदान- स्वच्छता ही सेवा" कार्यक्रमाचे आयोजन
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित स्वच्छता उपक्रमात निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2023 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2023
महात्मा गांधींना आदरांजली म्हणून "एक तारीख- एक तास" या राष्ट्रीय स्तरावरील "स्वच्छता ही सेवा" कार्यक्रमाअंतर्गत निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह निवृत्तीवेतन विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त सचिव एस.एन. माथूर आणि विभागाचे सर्व अधिकारी 1 ऑक्टोबर 2023 रोजी नेहरू पार्क, नीती मार्ग, नवी दिल्ली येथे श्रमदानात सहभागी झाले , यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले.

आपल्या प्रेरणादायी संदेशात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, स्वच्छता मोहीम हा केवळ सरकारी उपक्रम नसून आता ती एक लोकचळवळ बनली आहे.
यावेळी निवृत्तीवेतन विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त सचिव एस.एन. माथूर आणि निवृत्तीवेतन विभागाच्या इतर सर्व अधिकाऱ्यांनी महात्मा गांधींना स्वच्छांजली वाहिली.
'एक तारीख एक तास ' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यान स्वच्छ करण्यात स्वेच्छेने योगदान दिले. स्वच्छ भारत मिशनचा हा टप्पा पंतप्रधानांच्या “कचरामुक्त भारत” ही संकल्पना अधोरेखित करतो. पंतप्रधानांच्या या संकल्पनेच्या अनुषंगाने, निवृत्तीवेतन विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली विभागाचे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारक संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांच्या माध्यमातून विभागाने देशभरात व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. 1 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरातील केंद्र सरकारच्या सर्व 50 निवृत्तीवेतनधारक संघटनांनी “स्वच्छता श्रमदान” मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
* * *
NM/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1963230)
आगंतुक पटल : 108