शिक्षण मंत्रालय
दिल्ली विद्यापीठात इथे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वच्छता ही सेवा - श्रमदान उपक्रमाचे केले नेतृत्व
या उपक्रमाचे रूपांतरण जगातील सर्वात मोठ्या लोक नेतृत्व चळवळीत झाले - धर्मेंद्र प्रधान
पंतप्रधानांच्या प्रेरणेमुळे स्वच्छता हा आपला स्वभाव झाला आहे - धर्मेंद्र प्रधान
Posted On:
01 OCT 2023 2:28PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्लीच्या पटेल चेस्ट येथे स्वच्छता ही सेवा-श्रमदान उपक्रमाचे नेतृत्व केले. दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच नागरिकांनी महात्मा गांधी यांना स्वच्छांजली अर्पण करण्यासाठी या स्वच्छता मोहिमेत त्यांच्याबरोबर सहभाग घेतला. स्वच्छ भारत चळवळीचा नववा वर्धापन दिन साजरा करण्याच्या हेतूने स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत देशभर एक तारीख, एक घंटा, एक साथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम एक ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता एका तासासाठी घेण्यात आली.
प्रधान यांनी कचरामुक्त स्वच्छ भारत विकसित करण्याच्या संकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या उपक्रमाचे रूपांतर जगातील सर्वात मोठ्या लोकांच्या नेतृत्वाखालील चळवळीत झाले आहे, यावर प्रधान यांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने स्वच्छता हा आपला स्वभाव बनला आहे, असेही ते म्हणाले. हे जनआंदोलन ही फक्त एक सुरुवात असून या माध्यमातून आम्ही आमच्या शैक्षणिक संस्था कचरामुक्त करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करतो, असेही ते म्हणाले. महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री आणि आपल्या सर्व महापुरुषांना ही खरी स्वच्छतांजली असेल, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या सामुदायिक प्रयत्नाने आपली गावे, शहरे आणि जवळपासच्या सार्वजनिक ठिकाणांचे चित्र बदलता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
***
S.Patil/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962854)
Visitor Counter : 99