पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये स्क्वॅश प्रकारात पुरुष संघाने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2023 6:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये स्क्वॉश प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौरव घोषाल , अभय सिंग, हरिंदर संधू आणि महेश माणगावकर यांच्या पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळविल्याबद्दल आणि प्रतिष्ठेचे सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल आपल्या सौरव घोषाल , अभय सिंग, हरिंदर संधू आणि महेश माणगावकर या प्रतिभावंत स्क्वॅश पुरुष संघाचे अभिनंदन. या प्रयत्नामुळे अनेक युवा खेळाडूंना या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करून दाखवण्यासाठी प्रेरणा मिळेल. भारताला अतिशय आनंद झाला आहे !
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962523)
आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam