महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि बालविकास मंत्रालय ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून उद्या ‘एक तारीख, एक घंटा, एक साथ” उपक्रम राबवणार


या अभियानाअंतर्गत 29000 उपक्रमांचे नियोजन; अंगणवाडी केंद्र, वन स्टॉप केंद्र, आणि ‘एनआयपीसीसीडी’च्या कार्यालयात होणार कार्यक्रम

Posted On: 30 SEP 2023 10:58AM by PIB Mumbai

स्वच्छ भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात राबवल्या जाणाऱ्या, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून, महिला आणि बालकल्याण मंत्रालय उद्या ‘एक तारीख, एक घंटा, एक साथ’ हा उपक्रम राबवणार आहे. हे अभियान एक ऑक्टोबर 2023 रोजी, 10 वाजता एक तासासाठी राबवले जाणार आहे.

स्वच्छ भारत अभियान की केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची एक पथदर्शी योजना असून, या अंतर्गत, ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रम राबवला जातो. यंदाचा, स्वच्छता ही सेवा-2023 उपक्रम, 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान राबावला जाणार आहे. या उपक्रमाची संकल्पना, श्रमदान आणि लोकसहभागातून कचरा स्वच्छतेच्या दृश्य परिणामांच्या माध्यमातून, ‘कचरामुक्त भारत’ अशी आहे. सामुदायिक सहभागातून स्वच्छताविषयक उपक्रम राबवले जातील, याची खात्री करत, महिला आणि बालकल्याण विभाग या अभियानयाचे प्रत्यक्ष जमिनीवर दृश्य परिणाम दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे.

या उपक्रमात, देशभरातील 15 लाखांहून अधिक लोकांचा सहभाग असेल, अशी अपेक्षा करत, महिला आणि बालविकास मंत्रालयाने 29000 हून अधिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. "एक तारीख, एक घंटा, एक साथ" मोहिमेचा एक भाग म्हणून मंत्रालयांतर्गत अंगणवाडी केंद्रे, वन स्टॉप केंद्रे आणि राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बाल विकास संस्था (NIPCCD)च्या कार्यालयांमधे स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

या स्वच्छता मोहिमांमध्ये प्रामुख्याने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण आणि शहरी भागात अंगणवाडी केंद्रांजवळील सार्वजनिक जागा, बस आणि रेल्वे स्थानके, समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, नदी किनारे, घाट, नाले इत्यादी सार्वजनिक स्थळी स्वच्छता मोहीम राबवली जाईल. शिवाय, लहान मुले, गरोदर आणि स्तनदा मातांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त सहभागातून समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांची स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याविषयीची वचनबद्धता अधोरेखित होत आहे.

***

ShilpaP/RadhikaA/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1962318) Visitor Counter : 139