अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारत सरकारच्या खात्यांचा ऑगस्ट, 2023 पर्यंतचा मासिक आढावा
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2023 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
भारत सरकारच्या मासिक खात्यांचा ऑगस्ट 2023 पर्यंतचा एकत्रित अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.ठळक मुद्दे पुढील प्रमाणे:
भारत सरकारला ऑगस्ट 2023 पर्यंत 10,28,931 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये 8,03,944 कोटी रुपये कर महसूल (केंद्रसरकारचा), ₹2,09,582 कोटी बिगर-कर महसूल आणि 15,405 कोटी रुपये बिगर-कर्ज भांडवली प्राप्तीचा वाटा आहे. बिगर-कर्ज भांडवली प्राप्तीमध्ये 9,804 कोटी रुपये कर्जाच्या वसुली पोटी आहेत आणि 5,601 कोटींच्या विविध भांडवली प्राप्ती आहेत. या कालावधीपर्यंत भारत सरकारकडून 3,82,482 कोटी रुपये राज्य सरकारांना कराचा वाटा म्हणून हस्तांतरित करण्यात आले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 64,709 कोटीनी जास्त आहेत.
भारत सरकारने केलेला एकूण खर्च 16,71,757 कोटी रुपये इतका असून, त्यापैकी 12,97,958 कोटी महसूल खात्यावर आणि 3,73,799 कोटी भांडवली खात्यावर खर्च झाले आहेत.
एकूण महसुली खर्चापैकी, ₹3,67,539 कोटी हे व्याजाच्या देयकांपोटी आणि ₹1,80,739 कोटी मुख्य अनुदानासाठी खर्च झाले आहेत
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962242)
आगंतुक पटल : 156